Pandharpur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : सोलापूरमध्ये हैवानी बापाचं क्रूर कृत्य! पोटच्या जुळ्या मुलांची हत्या केली, नंतर स्वतःला संपवायला गेला अन्...

Pandharpur Crime News : पंढरपूरमध्ये घरगुती वादातून बापाने पोटच्या जुळ्या मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर बापाने देखील आत्महत्येचा प्रयत्त्न केला. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • करमाळा तालुक्यात जुळ्या मुलांच्या हत्येची धक्कादायक घटना

  • घरगुती वादातून वडिलांकडून विहिरीत ढकलून हत्या

  • घटनेनंतर आरोपी वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल; सखोल तपास सुरू

भरत नागणे, पंढरपूर

ऐन संक्रांतीच्या तोंडावर करमाळा तालुक्यात एका सैतानी बापाचा क्रूर चेहरा समोर आला आहे. पोटच्या अवघ्या सात वर्षांच्या दोन जुळ्या मुलांना विहीरीत ढकलून देऊन त्यांची हत्या केली आहे. नंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवांश आणि श्रेया सुहास जाधव असं मृत मुलांची नावे असून सदर घटना काल दुपारच्या सुमारास करमाळ्याच्या हिंगणी गावात घडली आहे. सुहास जाधव हे वीज कंपनीत कर्मचारी आहेत. घरात किरकोळ वाद झाल्याच्या घटनेतून सुहास जाधव याने मुलगा शिवांश आणि मुलगी श्रेया हिला हिंगणी येथील शेतातील विहीरीत ढकलून देऊन पोटच्या दोन मुलांचा जीव घेतल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर सुहास जाधव याने स्वतः फोनवरून या घटनेची माहिती आपल्या घरी दिली. त्यानंतर सुहास जाधव याने पश्चात्ताप झाल्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

सुहास जाधव यांच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मुलांची हत्या कोणत्या कारणाने केली याचा तपास आता पोलिस करत आहेत. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून दोन चिमुकल्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT