Pandharpur News: पंढरपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूर अर्बन बॅंकेच्या विविध ठिकाणी असलेल्या 22 एटीएम मशीनमध्ये छेडछाड करुन अज्ञात व्यक्तींनी सुमारे तीन कोटी रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Fraud News In Marathi)
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर (Pandharpur) अर्बन बँकेच्या विविध ठिकाणी असलेल्या 22 एटीएम मशीनमध्ये छेडछाड करुन अज्ञात व्यक्तींनी सुमारे तीन कोटी रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 15 मार्च ते 19 मे या दरम्यान सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, पुणे,सोलापूर,कराड,लातूर यासह इतर ठिकाणच्या बँकेच्या एटीएम मशीनमध्ये घडली आहे.
घटनेनंतर बँकेने पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. येथील पंढरपूर अर्बन बँकेच्या राज्यभरात विविध ठिकाणी अनेक शाखा आहेत. शाखा अंतर्गत एटीएमची सोय केली आहे. 19 मे रोजी एका व्यक्तीने एटीएम मशीन मधून जादा पैसे मिळत असल्याची माहिती बँकेच्या अधिकार्यांना दिली होती.
त्यानंतर एटीएम मशीनची तपासणी केली असता, जादा पैसे मिळत असल्याचा प्रकार बॅकेच्या निदर्शनास आला. या प्रकारानंतर बँकेच्या अधिकाऱ्याने पोलिसात धाव घेवून तक्रार दिली आहे. दरम्यान बँकेच्या दैनंदिन व्यवहारावर याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.