Pandharpur News : करमाळ्यातील शिवसेना नेत्या रश्मी बागल आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यामध्ये रविवारी पुण्यात बैठक झाली हाेती. या बैठकीनंतर रश्मी बागल या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा हाेती. साेमवारी मंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) साेलापूर (solapur) जिल्हा दाै-यावर हाेते. त्यामुळे बागल यांच्या राजकीय हालचालींवर समर्थकांसह राजकीय वर्तुळातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले हाेते. दरम्यान बागल यांनी सध्या काेणतीच भूमिका जाहीर केली नाही. परंतु पंढरपुरातील (pandharpur) काॅंग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्री सावंत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.
राज्याचे आराेग्य मंत्री तानाजी सावंत साेमवारी साेलापूर जिल्हा दाै-यावर हाेते. त्यांनी नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. त्यानंतर तेथील अधिका-यांची बैठक घेत आवश्यक त्या सूचना केल्या. अचनाक मंत्री महाेद्य यांच्या झालेल्या भेटीनं वैद्यकीय अधिकारी यांच्यासह रुग्णालय व्यवस्थापनाची भांबेरी उडाली हाेती.
दरम्यान शिवसेना नेत्या रश्मी बागल या शिंदे गटात प्रवेश करतील असे मानले जात हाेते. परंतु तसे झाले नाही. दूसरीकडे महिला काॅंग्रेसच्या प्रदेश सचिव मुबीना मुलाणी यांच्यासह काॅंग्रेसच्या महिला पदाधिका-यांनी साेमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या उपस्थितीत मुबिना मुलाणी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुबीना मुलाणी यांच्या प्रवेशामुळे पंढरपूर विभागात काॅंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.