Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Breaking News: पंंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिर परिसरात आढळलं भुयार; पाहा SAAM EXCLUSIVE व्हिडिओ

Vitthal Rukmini Mandir News Pandharpur: पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरात जुने भुयार आढळून आले आहे. मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळके यांनी याबाबतची माहिती दिली.

भारत नागणे

पंढरपूर, ता. ३१ मे २०२४

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या मंदिरात सध्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. अशातच आज मंदिर परिसरात कानोपात्रा मंदिराजवळ भुयार आढळून आले आहे. सात- ते आठ फुटाचे हे भुयार असल्याचे सांगण्यात येत असून आतमध्ये देवाची मुर्ती असल्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सध्या संवर्धन तसेच सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन, संवर्धन व्हावे यासाठी ७३ कोटी रुपयांच्या आराखड्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत नवे बांधकाम हटवून जुने रुप समोर आणले जात आहे.

अशातच आज मंदिर परिसरातील कानोपात्रा मंदिराजवळ अंतर्गत भुयार आढळून आले. सात ते आठ फूट खोलीचे हे भुयार असल्याचे सांगण्यात येत असून त्यामध्ये मूर्ती असण्याची शक्यता आहे. मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळके यांनी याबाबतची माहिती दिली असून पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी मंदीरात पोहोचले आहेत.

दरम्यान, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे 700 वर्षापूर्वीचे मुळ रुप समोर आल्यानंतर आता मंदिरातील नऊ दरवाजे चांदीने चकाकणार आहेत. यासाठी सुमारे 800 ते 900 किलो चांदीचा वापर केला जाणार आहे. विठ्ठल गर्भ गृहाच्या मुख्य दरवाजा बरोबरच चौखांबी आणि सोळखांबी मंडपातील आठ दरवाजांवर चांदीचे नक्षीकाम केले जाणार आहे. या बरोबरच मंदिरातील गरुड खांब, मेघडंबरी देखील चांदीने मडवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT