Pandharpur APMC Market Raisin Rate:  Saamtv
महाराष्ट्र

Raisin Rate News: बेदाण्याचा भाव वाढला! पंढरपुर बाजार समितीमध्ये मिळाला उच्चांकी दर

Pandharpur APMC Market Raisin Rate: बेदाणे सौदे बाजारात पाटकूल येथील शेतकरी नितीन गावडे यांच्या बेदाण्याला उच्चांकी 400 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला आहे. हा दर बेदाणा सौदे बाजारातील आजपर्यंतचा सर्वाधिक दर मानला जात आहे.

भारत नागने

Pandharpur APMC News:

पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणे सौदे बाजारात उच्चांकी 400 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला. बेदाणे सौदे बाजारात पाटकूल येथील शेतकरी नितीन गावडे यांच्या बेदाण्याला उच्चांकी 400 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला आहे. हा दर बेदाणा सौदे बाजारातील आजपर्यंतचा सर्वाधिक दर मानला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंढरपुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, उस्मानाबाद, तासगाव, जत, कर्नाटक, इंदापूर यासह राज्याच्या विविध भागातून बेदाणा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येतो. मंगळवारी या बाजार समितीत सुमारे 2 हजार 500 टन बेदाण्याची आवक झाली होती.

यामध्ये पाटकूलचे शेतकरी नितीन गावडे यांच्या 660 किलो बेदाण्याला विक्रमी 400 रुपयांचा भाव मिळाला. तर इतर शेतकऱ्यांच्या बेदाण्याला सरासरी 170 रुपये प्रतिकिलो दर मिळाला. सांगलीच्या व्यापाऱ्याने गावडे यांंचा बेदाणा 400 रु. प्रतिकिलो दराने खरेदी केला. उच्चांकी दर मिळाल्यानंतर शेतकरी नितीन गावडे यांचा बाजार समितीच्या वतीने माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रायगडमध्ये वणव्याचा हाहाकार; शेतकऱ्यांचे नुकसान..

रायगड जिल्ह्यातील (Raigad) पोलादपुर तालुक्यात गेल्या दोन दिवसात वणव्यामुळे पळचील आणि कापडे येथे वणव्यामुळे मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेत 6 गुर आणि 15 कोंबड्यांचा मृत्यू झाला असून गुरांचा जळून खाक झाला आहे तर कापडे येथे हेमंत साने या शेतकऱ्यांची काजूची 40 कलमी झाड जळून खाक झाली आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जाचा हप्ता कमी होणार की वाढणार? RBI रेपो रेटबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार

१९७८ साली ५० हजारांना घेतला फ्लॅट, पण पझेशनच मिळालं नाही; अखेर 48 वर्षांनी मिळाला न्याय; नेमके प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील वृक्षतोडी प्रकरणी आज राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी

Blood Pressure : सावधान! उन्हाळ्यात अचानक ब्लड प्रेशर वाढतो? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Diabestes Control And Liver Detox Drink: कारले की कडुनिंब? कोणता रस लिव्हर, ब्लड शुगर आणि स्किनसाठी सर्वात बेस्ट?

SCROLL FOR NEXT