Pandharpur Accident News:  Saamtv
महाराष्ट्र

Pandharpur Accident: ड्रायव्हर दारुच्या नशेत झिंगाट, भरधाव ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसला; २ कार अन् बाईक्सचा चुराडा

Pandharpur Accident News: पंढरपूरजवळ गुरसाळे गावानजीक भरधाव ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसल्याने एकच खळबळ उडाली.

भारत नागणे

Pandharpur Accident:

पंढरपूरमधून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. पंढरपूरजवळ गुरसाळे गावानजीक भरधाव ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसल्याने एकच खळबळ उडाली. या अपघातात दोन कार आणि मोटारसायकलचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसून चालक दारुच्या नशेत असल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसल्याची घटना पंढरपूर जवळच्या गुरसाळे गावात घडली. हा ट्रक टेंभुर्णीकडून पंढरपूरकडे जात होता. गुरसाळे गावाजवळ ट्रक अनियंत्रित होऊन थेट रस्ता सोडून हॉटेलमध्ये शिरला.

या घटनेत हाॅटेल जवळ थांबलेल्या दोन कार आणि मोटारसायकलचा चेंदामेंदा झाला. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र अपघातात तीन वाहने चक्काचूर झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ट्रकचा चालक दारुच्या नशेत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कर्नाटकमध्ये भीषण अपघात...

कर्नाटकमध्ये गुरूवारी (26, ऑक्टोंबर) भीषण अपघाताची (Karnataka Accident) घटना घडली. ट्रक आणि कारच्या भीषण अपघातामध्ये १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील (Karnataka) चिकबल्लापूर (Chikkaballapur) येथे ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: आधारवाडीतील इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

SCROLL FOR NEXT