Pandharpur Aashadhi Wari Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Vitthal Mandir : विठ्ठलाच्या लाडू प्रसादात यंदा सुक्या मेव्याचा वापर; आषाढीनिमित्ताने बनविणार ११ लाख लाडू

Pandharpur News : आषाढी यात्रेसाठी विठ्ठल मंदिर समितीची तयारी सुरु आहे. अवघ्या पंधरा दिवसांवर आषाढी एकादशी असल्याने भाविकांची आतापासूनच रीघ लागली आहे. दर्शन बारीमध्ये आतापासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या असून भाविकांची हि संख्या रोज वाढत आहे

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरात आषाढी यात्रेची जोरदार तयारी सुरु आहे. भाविक देखील पंढरपुरात जाऊन विठूरायाचे दर्शन घेत आहेत. दरम्यान पुढील काही दिवसात भाविकांची संख्या वाढणार आहे. या दृष्टीने प्रशासन व मंदिर समितीची तयारी सुरु आहे. दरम्यान आषाढी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर समितीने यंदा अकरा लाख लाडू प्रसाद बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यंदा या लाडू प्रसादात सुका मेव्याचा देखील वापर करण्यात येणार आहे. 

आषाढी यात्रेसाठी विठ्ठल मंदिर समितीची तयारी सुरु आहे. अवघ्या पंधरा दिवसांवर आषाढी एकादशी (Ashadhi ekadashi) असल्याने भाविकांची आतापासूनच रीघ लागली आहे. दर्शन बारीमध्ये आतापासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या असून भाविकांची हि संख्या रोज वाढत आहे. तर विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लाडूचा प्रसाद दिला जात असतो. त्या अनुषंगाने यंदा ११ लाख लाडू बनविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार (Pandharpur) आत्तापर्यंत २ लाख लाडू तयार करण्यात आले आहेत. लाडू तयार करण्यासाठी सध्या १०० कर्मचारी काम करत आहेत.

लाडूसाठी असे वापरली साहित्य 

वारीसाठी लाडू प्रसाद तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. लाडू तयार करण्यासाठी २०० क्विंटल हरभरा दाळ, ३०० क्विंटल साखर आणि १५ हजार किलो तेलाचा वापर केला जाणार आहे. तर विठ्ठलाच्या लाडू प्रसादामध्ये यंदा प्रथमच सुका मेव्याचा वापर करण्यात येत असून यात ४०० किलो बेदाणा, ३०० किलो काजू आणि २० किलो विलाईची यांचा वापर करण्यात आला आहे. सुक्या मेव्याचा वापर करून तयार करण्यात आलेल्या पौष्टिक लाडू प्रसादाला भाविकांकडून यंदा मोठी मागणी वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT