- राजेश भोस्तेकर
रायगड : अलिबाग येथे आज श्री मल्हारी मार्तंड देवाचा पालखी सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. पारंपरिक बेंजो आणि टीमकीच्या तालावर कोळी महिलांनी ठेका धरला होता. श्री मल्हारी मार्तंड देवाचा हा उत्सव पाच दिवस भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमात संपन्न होणार आहे. कोरोनाच्या (Corona) दोन वर्षात पालखी सोहळा हा झाला नव्हता.
हे देखील पहा :
मात्र, कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने पालखी उत्सव सोहळा यावेळी कोळी बांधवांनी उत्साहात साजरा केला. अलिबाग (Alibag) महादेव कोळी समाजातर्फे पूर्वापार श्री मल्हारी मार्तंड देवाचा उत्सव साजरा करत आहेत. अलिबाग कोळीवाडा येथील श्री मल्हारी मार्तंड मंदिरात उदाचा देवकार्य कार्यक्रम दुपारी तीन वाजता पार पडला. त्यानंतर मंदिरातून श्री खंडोबा देवाची पालखी बाहेर पडली.
ही पालखी ठिकरूळ नाक्यापर्यंत नेण्यात आली त्यानंतर पुन्हा मंदिरात आली. यावेळी कोळी बांधवातर्फे हळद आणि खोबऱ्याचा भंडारा उधळला. ठिकठिकाणी खंडोबा देवाची आरती करून भाविकांनी दर्शन घेतले. हळदीच्या भंडाऱ्याने सारा परिसर माखून गेला होता. पालखी सोहळ्यात बँड आणि टीमकीच्या सुरेल वाद्यावर कोळी बांधवानी ताल धरला होता.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.