Palghar uncle talking crow video viral Saam Tv News
महाराष्ट्र

Palghar Talking Crow : तुम्ही पाहिलाय का कधी बोलणारा कावळा? काका, बोलणाऱ्या कावळ्याचा VIDEO व्हायरल

Palghar Talking Crow News : तुम्ही कधी बोलणारा कावळा पाहिला का...? होय, कावळाही माणसाप्रमाणे बोलतो...हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही...पण, तुम्हीच बघा, हा कावळा कसा बोलतोय...

Prashant Patil

पालघर : काका, काका असं प्रेमाने बोलणारा हा कावळा...सध्या या कावळ्याने सोशल मीडियावर चांगलाच भाव खाल्लाय. अगदी माणसाप्रमाणेच हा कावळा काका म्हणून हाक मारतोय. या कावळ्याला माणसांची एवढी गोडी लागलीय की तो लहान मुलांसारखं बोबड्या आवाजात हाक मारतो. यामुळेच या कावळ्याचे सगळेच लाड करतात. अंगा खांद्यावर या कावळ्याला सगळेच खेळवतात.

पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील गारगाव इथे राहणाऱ्या मंगळ्या मुखणे यांनी हा कावळा पाळलाय. तीन वर्षापूर्वी त्यांच्या मुलांनी पिल्लू असताना या कावळ्याला आणलं. कुटुंबातील सदस्याप्रमाणेच या कावळ्याला सगळ्यांनी लळा लावला. त्याला वेळेत खाणं-पाणी अशा सगळ्या सुविधा कावळ्याला दिल्या. मुलं जशी बोलतात तसाच हा कावळाही बोलू लागला. आता या कावळ्याच्या सगळेच प्रेमात पडलेत. त्याला पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येऊ लागलीय. याआधी तुम्ही आण्णा आण्णा बोलणारा कोंबडाही पाहिला होता. मात्र, आता या कावळ्याने काका काका बोलून सगळ्यांनाच आपलंस केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार

Bharti Singh Divorce : भारती सिंगचा ९ वर्षानंतर संसार मोडणार? कॉमेडी क्वीनने नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Panvel : भव्य सुळ्यासारखा अन् सुईच्या टोकासारखा दिसतो पनवेलजवळील किल्ला, 'येथे' जाण्याआधी ट्रेकर्स १०० वेळा करतात विचार

Labour Code Rules: ४ दिवस काम अन् ३ दिवस सुट्ट्या; नवीन कामगार कायद्यात कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा

IPL 2026 : लाईव्ह टीव्हीवर ऋषभ पंतची जीभ घसरली, अश्लील शब्द वापरला, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT