Palghar students forced to walk on railway tracks to reach school saam tv
महाराष्ट्र

पालघरमध्ये विद्यार्थ्यांची जीवघेणी पायपीट, शाळा गाठण्यासाठी मृत्यूच्या ट्रॅकवरुन प्रवास

A Deadly Journey to School: देशात विविध प्रकल्पांचा सपाटा लावला जात असताना दुसरीकडे धक्कादायक वास्तव समोर आलंय. पालघरमध्ये विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 'साम टिव्ही'च्या नेक्स्ट जेन रिपोर्टरनं थेट 'ग्राऊंड रिपोर्टिंग' केलंय... पाहूयात...

Girish Nikam

ऐकलंत... हा आक्रोश आहे पालघरमधील शालेय विद्यार्थ्यांचा... शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं या विद्यार्थ्यांना रेल्वे रुळांवरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. पालघर जिल्ह्यातील सफाळे आणि वैतरणा रेल्वे स्थानकांदरम्यान वाढीव बेटावरील शालेय विद्यार्थांची दररोज मृत्यूला हुलकावणी देत पायपीट सुरू आहे. शाळा गाठण्यासाठी रस्ता आणि पूल नसल्यानं विद्यार्थ्यांना चक्क रेल्वे ट्रॅकवरून जावं लागतंय. विद्यार्थ्यांसह स्थानिकांनाही रोज अडचणीचा सामना करावा लागतोय. या गैरसोयीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी साम टीव्हीच्या नेक्स्ट जेन रिपोर्टरने 'ग्राऊंड रिपोर्टिंग' केलंय. आणि थेट मुख्यमंत्र्यांनाच साद घातलीये...

काही दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील विद्यार्थिनींनी रस्त्यांच्या दुरावस्थेकडे अनोख्या पद्धतीनं सरकारचं लक्ष वेधलं होतं. शाळकरी मुलींनी ढिसाळ कारभाराची पोलखोल केल्यानंतर ढिम्मं प्रशासन खडबडून जागं झालं. इकडे पालघरमध्येही विद्यार्थ्यांनी आपली व्यथा साम टीव्हीच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणली आहे. आमच्याच नशीबी मृत्यूचा ट्रॅक का? विद्यार्थ्यांचा हा आर्त सवाल प्रशासनाला जाग आणणार का? हा खरा सवाल आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण?

आतातरी स्थानिक प्रशासनाकडून आणि रेल्वे विभागाकडून तातडीनं पावलं उचलली जाणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: फेस हेअरसाठी तुम्हीपण रेजर वापरताय? चेहऱ्यावर रेजर वापरण्यापूर्वी जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

मुंबईची मोकळी मैदानं भाजप ढापायला निघालंय; ठाकरेंचा CM फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

Sugar Process: गोड पदार्थ खायला फार आवडतात? पण, तुम्हाला माहिती आहे का त्यातील साखल कशी तयार होते?

चार राशींवर शनिदेवाची कृपादृष्टी! आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; वाढणार धन, दौलत

Mehandi Tips मेहंदी रंगेना ! डार्क मेहंदी करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT