Saam Tv
हातावर मेहंदी लावण्यापूर्वी मेहंदीचे तेल लावा. त्यामुळे रंग अधिक गडद होण्यास मदत होईल.
मेहंदी सुकल्यानंतर त्यावर लिंबाच्या रसात थोडी साखर मिसळा. हलक्या हाताने मेहंदीवर लावा. यामुळे मेहंदी काळी रंगून येते.
तव्यावर किंवा पॅनमध्ये लवंगा गरम करा. हातांना थोडी वाफ द्या. धुरी जमत नसेल तर लवंगाचे तेलही वापरू शकता.
मेहंदी सुकल्यानंतर ती काढा. हातांवर थोडे मोहरीचे तेल लावा. यामुळे रंग अधिक काळा उमटेल.
मेहंदी सुकल्यावर हलक्या हाताने साखरेचे पाणी मेहंदीवर सोडा. पाणी सुकू द्या. सुकल्यावर पाण्याने धुवा. मेहंदी एकदम काळी उमटेल
मेहंदी सुकवा. सुकलेल्या मेहंदीवर गवती चहापत्तीचे पाणी किंवा कॉफिचे पाणी सोडा. यामुळे मेहंदीला रंग येईल.
हे प्रयोग करण्यापुर्वी छोटा पॅच टेस्ट नक्की करा. तुमच्या स्किनला सूट न झाल्यास अॅलर्जी होऊ शकते.