Saam Tv
रेस्टॉरंटमध्ये जसा कुरकुरीत डोसा मिळतो, तसा आपण घरीच करण्याचा प्रयत्न करतो. पण कुठेतरी रेसिपी चुकते आणि हवा तसा कुरकुरीत डोसा तयार होत नाही.
घरी रेस्टॉरंटसारखा पातळ आणि कुरकुरीत पेपर डोसा बनवणे अगदी सोपा आहे. त्यासाठी सर्वप्रथम तांदूळ, उडीद डाळ स्वच्छ धुवून घ्या.
संपूर्ण रात्र तांदूळ आणि डाळ वेगवेगळी भिजत ठेवा. बॅटर तयार करून तेही एक रात्र आंबवू द्यावे. त्यामुळेच डोसा पातळ आणि छान कुरकुरीत होतो.
तवा चांगला तापू द्या. त्यानंतर थोडा थंड झाल्यावर बॅटर व्यवस्थित पसरवा.
बॅटरला तव्यावर पातळसर थर करून पसरवा. पळी किंवा पेल्याच्या मदतीने तुम्ही बॅटर पसरवू शकता.
तव्याच्या कडांवर थोड तेल किंवा तूप सोडा. त्यामुळे डोसा आणखी कुरकुरीत व्हायला मदत होते.
डोसा मध्यम आचेवर शिजवा. डोश्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत शिजवून घ्या.
डोसा कुरकुरीत झाल्यावर हळूहळू दुमडा. कुरकुरीत पेपर डोसा नारळाची चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.