Saam Tv
पावसाळ्यात घरभर असणारा ओलावा आणि मुंग्याचा सुळसुळाट यामुळे वैताग येतो. तांदूळ ते खाऊच्या डब्ब्यांपर्यंत मुंग्या पसरलेल्या असतात. काही घरगुती टिप्स करून मुंग्या कायमच्या गायब करू शकता.
सम प्रमाणात व्हिनेगर आणि पाणी मिसळा . किचनमध्ये, घराच्या कोपऱ्यांमध्ये फवारा. व्हिनेगरमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे मुंग्या दूर राहतात.
कॉफी आणि मीठाचे पाणी एकत्र स्प्रे करा. कॉफीच्या स्ट्राँग वासामुळे मुंग्या कायमच्या दूर होतात. झाडांच्या तळाशी मुंग्या लागल्या असतील तर या वासाने गायब होतील.
काळीमिरीचा स्ट्राँग वास मुंग्याना आवडत नाही. जिथून मुंग्या येत असतील, मुंग्याचे छिद्र असतील तिथे काळीमिरी लवंगाची पूड टाका.
लिंबाच्या रसात अॅसिडिक गुणधर्म असतो. त्या रसात पाणी मिसळून मु्ंग्याच्या रांगेवर फवारा. मुंग्या कायमच्या गायब होतील.
कापूर बारीक करून पाण्यात मिसळा. त्याचा स्प्रे करून मुंग्यावर फवारा. कापराच्या वासाने मुंग्या पळून जातील .
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.