Maharashtra News Live Update Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

Marathi Breaking Live Headlines Updates: राज्यात पावसाचा हाहाकार सुरूच, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पिंपरी-चिंचवड शहरांना पावसाचा अलर्ट, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगाव तालुक्यातील सौदाणे जवळील आशियाना बियर बार समोर कॅटेनर व दुचाकी यांच्यात भीषण अपघात घडला असून यात दुचाकीवरील एक जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहे.मालेगाव येथून कंटेनर नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला,अपघात होतातच नागरिकांनी धाव घेत दोघा जखमींना तात्काळ मालेगाव येथे उपचारासाठी हलवले,अपघात नेमका कसा घडला या बाबत मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.अपघातग्रस्त हे मालेगाव येथील असल्याची सांगितले जात आहे.

शिरूर शहरात भटक्या कुत्र्यांचा महिलेवर हल्ला; महिला थोडक्यात बचावली

शिरूर : शिरूर शहरातील सोनार आळी परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात महिला थोडक्यात बचावली असून स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावल्याने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले.. दुचाकी व चारचाकी गाड्यांचे नुकसान .. अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले,झाड बाजूला करण्याचे काम चालू

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे–पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत बदल

१० ते १५ जुलैदरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ निमित्त राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ (पुणे–पंढरपूर/पुणे–बारामती मार्ग) वरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याची अधिसूचना जारी केली आहे.

मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

मालेगाव ( नाशिक )

- बीड, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर मध्ये ATS च्या छाप्या नंतर नाशिकच्या मालेगावात देखील ATS चा छापा

- मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

- रमजान पुरा भागातून एका संशयिताला ATS च्या पथकाने घेतले होते ताब्यात...

- संशयिताची ATS पथकाकडून जवळपास दोन तास चौकशी...

- संशयास्पद काही मिळून न आल्याने संशयिताची चौकशी झाल्यानंतर सुटका

कथित महाराज किशोर जाधव शिवणीकर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

-लातूरच्या खंडापूर येथील "उत्सव संतांचा कुंभमेळावा वारकऱ्यांचा"या उत्सवातील कथित ३ कोटी ६५ लाखाच्या देणगी अपहार प्रकरणातील आरोपी किशोर धोंडीराम जाधव याला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली आहे.

मोशी दुर्घटनेवरून आयुक्त कार्यालयात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी आज दुपारी २:३० वाजता शिवसेनेच्या नगरसेवकांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, सुलभा उबाळे, ऐश्वर्या तरस, निलेश तरस, राजेंद्र तरस यांच्यासह शिवसेनेचे अन्य नगरसेवक उपस्थित होते. मोशी दुर्घटनेला ४८ तासांहून अधिक कालावधी उलटूनही बचावकार्य सुरू असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी दोषींवर कठोर कारवाई व निष्पक्ष चौकशीची मागणी केली.

चाकणच्या घटनेनंतर शिरूरमध्येही महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, शिरूर शहरातील सोनार आळी परिसरात कुत्र्यांनी आणखी एका महिलेवर झडप घातली. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे ही महिला थोडक्यात बचावली. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ठाण्यात जुन्या चाळीचा पहिला मजला कोसळला; महिला आणि दोन लहान मुले जखमी

ठाण्यातील आझाद नगर परिसरातील मद्रास चाळ येथील चाळीतील पहिला मजलावरील बांधकाम पडले..

बांधकामात तीन जण जखमी

एक महिला व दोन लहान मुलांचा समावेश

स्थानिक नागरिकांनी व आपत्कालीन विभाग अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना बाहेर काढून खाजगी रुग्णालयात दाखल केले आहेत...

25 ते 30 वर्षांपूर्वीचा बांधकाम आहे.

मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाचे अतोनात नुकसान 

सततच्या पावसामुळे टोमॅटो सडून खराब झाले आहेत, तर दुसरीकडे बाजारपेठेतही या टोमॅटोल खरेदीदार मिळेनासे झाले आहेत. बाजारभाव पूर्णपणे कोलमडल्यामुळे संतप्त आणि हतबल झालेल्या शेतकऱ्यांवर मोठ्या मेहनतीने पिकवलेले टोमॅटो चक्क अष्टविनायक महामार्गावरती फेकून देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

वसई-विरार पट्ट्यात लोकल सेवा विस्कळीत होण्याच्या समस्येवर तोडगा

वसई-विरार पट्ट्यात पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होण्याच्या समस्येवर पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. वसई रेल्वे क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या रुळांची उंची ४०० मिमी (सुमारे १.३ फूट) वाढवण्यात येणार आहे.

विलास घुले हत्या प्रकरणात आरोपींवर कारवाईसाठी घुले कुटुंबीयांचे ठिय्या आंदोलन 

विलास घुले हत्या प्रकरणात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी यासह खासदार बजरंग सोनवणे चे पुत्र सौरभ सोनवणे ला अटक करावी या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

देवेद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला 

फडणवीस पुढे म्हणाले की, ते (राज ठाकरे) आमचे मित्र आहेत आणि ते राजकारणात असल्यामुळे आम्हाला त्यांच्यापासून कोणताही धोका नाही. पण ते जर मिमिक्री किंवा स्टँड-अप कॉमेडीच्या क्षेत्रात गेले असते, तर इतर कोणत्याही स्टँड-अप कॉमेडियनला मार्केट उरले नसते.

अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली. खोट्या बातम्या, अफवा पसरवणं महाराष्ट्राचा अपमान आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावर देवेंद्र फडणवीस बोलत होते.

खासदार अमर काळे ऑन पृथ्वीराज चौहान वक्तव्य की राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ 

वर्धेचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी पृथ्वीराज चौहान यांनी केलेल्या वक्तव्यवर वर्धेत पत्रकारांशी संवाद साधतं प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर गळती 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार्बन डाय ऑक्साईडचा टँकर लिक झाला. हा गॅस डोळ्यांना आणि शरीराला घातक ठरतो, त्यामुळं गॅस लिक तातडीनं थांबवण्याचं आव्हान यंत्रणांसमोर होतं. महामार्ग पोलिसांनी ती तत्परता आणि प्रसंगावधान दाखवत पुढची दुर्घटना टाळली. मुंबई हुन पुण्याच्या दिशेने निघालेला हा टँकर खंडाळा बोगद्याच्या आधी थांबवण्यात आला.

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण, चार आरोपींना १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे, रमेश पवार, प्रमोद निकम आणि अक्षय कारंडे यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले.

नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे रमेश पवार प्रमोद निकम आणि अक्षय कारंडे यांना कल्याण कोर्टात केले हजर चारही आरोपीना १३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी

वसई रेल्वे क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या रुळांची उंची ४०० मिमी वाढवण्यात येणार

  • वसई-विरार पट्ट्यात पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होण्याच्या समस्येवर पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

  • वसई रेल्वे क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या रुळांची उंची ४०० मिमी (सुमारे १.३ फूट) वाढवण्यात येणार आहे.

  • पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांच्या पाहणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • तसेच, बोरिवली–विरार पाचवी-सहावी मार्गिका उभारताना नवीन रुळही अधिक उंचीवर बांधण्याचे निर्देश एमआरव्हीसीला देण्यात आले आहेत.

दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा : अमोल कोल्हे

पिंपरी चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो प्रशासकीय इमारत दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिरूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.

पूर परिस्थिती ओसरल्यानंतर ट्रॅक्टरला भाजपाचे झेंडे लावून पाण्याचं वाटप करणाऱ्या नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यावर संतप्त नागरिकांचा हल्लाबोल

वसईच्या प्रभाग क्रमांक 23 मधील भाजपच्या नगरसेविका निम्मी निपुण जोशी, प्रतीक पवार हे वसई पश्चिमेच्या साईनगर परिसरात पाणी वाटण्यासाठी गेले होते

नागरिक संतप्त झालेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

साचलेल्या पाण्यात नागरिक नरक यातना भोगत असताना भाजपाचे नगरसेवक, आमदार कुठे गेले होते.

आता झेंडे लावून रिल्स बनवायला आलात का? असा संतप्त नागरिकांचा सवाल

अजित पवारांच्या आठवणीने सुनील तटकरे भावूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील सुनील तटकरे यांचा वाढदिवस आज सुतारवाडीत निवासस्थानी साजरा झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील पदाधिकारी, हितचिंतक नागरिक यांनी गर्दी केली होती. आज वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी सकाळी अजित पवार यांच्या फोनची वाट पहात होतो परंतु फोन आला नाही हे सांगताना सुनील तटकरे भावूक झाले होते.

पुण्यात पालखीत चोरांचा सुळसुळाट अनेक वारकऱ्यांचे मोबाईल पैसे चोरट्यांनी लांबवले

किसन काळे नावाच्या वारकऱ्याला अश्रू अनावर, चोरट्याने अंघोळ करताना अंगाला खाज येणारी पावडर टाकली आणि मदतीच्या बहाण्याने 5 हजार लांबवले

वारवडीच्या मरीआई माता मंदिरात चोरी; १ लाख ५५ हजारांची चांदीची महिरप लंपास

पुरंदर तालुक्यातील वारवडी येथील मरीआई माता मंदिराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी गाभाऱ्यातील अंदाजे दोन किलो वजनाची चांदीची कोरीव महिरप आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर (DVR) चोरून नेला आहे. ही घटना ६ जुलैच्या रात्री ते ७ जुलै २०२६ च्या सकाळ दरम्यान घडली असून, एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

पुणे जिल्हा सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आज सासवड येथील प्रशासकीय इमारतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पुरंदर तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.

सांगलीत मालमत्तेसाठी नात-जावयाने केला वृद्ध सासूचा खून

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे एका नातजावयाकडून वृद्ध सासूचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मालमत्तेच्या वादातून नात जावयाने खून केल्याचं समोर आले आहे.. याप्रकरणी नातजावई राजेश गायकवाड याला अटक करण्यात आली आहे

खासदार पुत्राला अटक करा, विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्याच्या मागणीसाठी आंदोलन

केज तालुक्यातील टाकळी येथील तरूण विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा, पुरवणी जबाबात नाव दिले असुन खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक करा या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

लोणावळ्यातील पूरग्रस्त नागरिकांचा संताप, लोणावळा नगरपरिषद मध्ये आणला नागरिकांनी मोर्चा

लोणावळ्यातील पूरग्रस्त नागरिकांचा संताप आज अखेर उफाळून आला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर मदतीची मागणी करत नागरिकांनी थेट नगरपरिषदेवर धडक देत नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना घेराव घातला. विशेष म्हणजे, मुख्याधिकारी गैरहजर असल्याने संतप्त नागरिक अधिकच आक्रमक झाले आणि नगरपरिषद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पाकिस्तानी गँगस्टर शहबाज भट्टी सोबत लिंक असल्याच्या माहितीवरून दहा तरुणांना नागपूर ATS ने घेतलं ताब्यात

यात नागपूर शहरातून पाच आणि उर्वरित तरुण विदर्भातील काही जिल्ह्यांमधून आहेत.

त्यांना एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणावरून कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे.

शहबाज भट्टी सोबत सोशल मीडियावरून हे तरुण संपर्कात असल्याची माहिती.

ते भट्टी साठी कसल्या प्रकारचे काम करणार होते, त्यांना पुढील टास्क काय देण्यात आले होते आणि त्यांना कसा मोबदला मिळणार होता याची माहिती घेणे सुरू आहे.

ATS चे अधिकारी याविषयी काहीही बोलत नाहीत.

Jalna : जालन्यात कृषीविभागाने फुकट वाटलेलं महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवलच नाही

जालन्यात कृषीविभागाने फुकट वाटलेलं महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवलच नाही,

कृषी विभागाने वाटलेलं महाबीज बियाणं निकृष्ट दर्जाच तर मग कृषी विभागाने वाटप का केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सवाल.

Nandurbar : तळोद्यात सिनेस्टईल मोबाईल दुकान फोडले.

तळोद्यात सिनेस्टईल मोबाईल दुकान फोडले

दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून मोबाईल लांपास

अंदाजीत 25 ते 30 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 जुलै रोजी

रपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 जुलै रोजी

आरोपी जयराम चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

न्यायालयात या प्रकरणात जी एकत्रित चार्जशीट दाखल करण्यात आली ती नामंजूर करावी असा अर्ज आरोपी पक्षाने केला होता

Latur : लातूरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच आंदोलन

MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज लातूरमध्ये आंदोलन पुकारले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि इतर विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ह्या ऑनलाइन सीबीटी CBT पद्धतीने घेतल्या जात आहेत.

दरम्यान या पद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Hingoli : हिंगोलीत बोगस बियाण्याचा सुळसुळाट

हिंगोलीत बोगस बियाण्याचा सुळसुळाट

हिंगोलीच्या पेडगाव शिवारात शेतकऱ्यांनी पेरणी केलेली बियाणे उगवले नाही

सोयाबीनचे बियाणे बोगस मिळाल्याने शेतकरी संकटात

Pune : पुण्यात वारकऱ्यांची गैरसोय

पुण्यात वारकऱ्यांची गैरसोय

पुण्यात गोरगरीब वारकऱ्यांची मनपाकडून लुट

मनपाचं शौचालय वापरायला मागितले जात आहेत पैसे

वारकऱ्यांसाठी मोफत शौचालयाचा मनपाचा दावा खोटा

भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत; वनविभागाचे बचावकार्य!

कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे नळ्याचापाचा येथे एका विहीरीत बिबट्या पडल्याची घटना समोर आली आहे.

वेताळबांबर्डे येथील एका ग्रामस्थांच्या घराशेजारील विहीरीत भक्ष्याच्या शोधात असलेला हा बिबट्या पडला होता.

याची माहीती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळावर दाखल झाली.

करमाळ्यात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळला.

करमाळा तालुक्यातील कोमने येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारतीचा स्लॅब कोसळला असल्याची घटना नुकतीच घडली.

सुदैवाने या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. गेल्या काही दिवसापासून पशुवैद्यकीय दवाखान्याची मर्दा अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे.

या इमारतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्लॅब कोसळण्याची घटना घडली. सदरची इमारत तत्काळ देखभाल व दुरुस्ती करून पूर्वत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांसह नागरिकातून होत आहे.

विलास घुले खून प्रकरणी आज न्यायिक मागणीसाठी केजमध्ये निघणार मोर्चा

विलास घुले खून प्रकरणी आज न्यायिक मागणीसाठी केजमध्ये निघणार मोर्चा.

25 ते 30 हजार लोकांचा जनसमुदाय मोर्चात होणार सहभागी

सर्वपक्षीय नेतेही असणार या मोर्चात सहभागी

धोकादायक झालेली कोळंबे हायस्कूलची इमारत अखेर सील

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे धोकादायक ठरलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे येथील कमळजाबाई हायस्कूलची नवीन इमारत अखेर पोलिस बंदोबस्तात सील करण्यात आली आहे.

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज कल्याण कोर्टात हजर करणार

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरण

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज कल्याण कोर्टात हजर करणार

Nanded : स्वच्छ शहर सुंदर शहर अभियानांतर्गत नागरिकांना कचराकुंड्यांचे वाटप

स्वच्छ शहर सुंदर शहर अभियानांतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी अमोल चव्हाण यांच्या वतीने नागरिकांना 450 कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले.

नांदेडच्या लोहा शहरात हा उपक्रम राबविण्यात आला.

लोहा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या कचराकुंड्याचे वाटप नागरिकांना करण्यात आले.

konkan: वेंगुर्ल्यातील आडेली धरणाच्या भिंतीला भगदाड, आजपासून करणार पाण्याचा विसर्ग

वेंगुर्ल्यातील आडेली धरणाच्या भिंतीला भगदाड, आजपासून करणार पाण्याचा विसर्ग

वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथील धरणाच्या भिंतीला विहिरीकडील भागात मोठे भगदाड पडल्याने धरणाची भिंत फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

यामुळे आज शुक्रवार पासून या धरणातील पाणी साठ्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

Jalna: समृद्धी महामार्गावर प्रवाशांची आर्थिक लूट, चहा 20 रुपयांना तर मिसळपाव 120 रुपयांना

जालना -

समृद्धी महामार्गावर प्रवाशांची आर्थिक लूट

चहा 20 रुपयांना तर मिसळपाव 120 रुपयांना....

समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या हॉटेलांमध्ये खाद्यपदार्थांची अवास्तव दराने विक्री....

Buldhana: बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाची धाडसी कारवाई

बुलढाणा -

बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाची धाडसी कारवाई

मध्यप्रदेशातून बुलढाणा जिल्ह्यात येणारा प्रतिबंधित गुटक्याचा ट्रक मोठ्या सीताफिने पकडला.

अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई.

मध्य प्रदेशातून गुटख्याची तस्करी करणाऱ्या घटका तस्करांचे धाबे दनाणले.

Hingoli: शेतकऱ्याच्या काढणीला आलेल्या केळीच्या बागेवर विषप्रयोग

हिंगोली -

शेतकऱ्याच्या काढणीला आलेल्या केळीच्या बागेवर विषप्रयोग

बागेवर विषारीद्रव्य टाकल्याने हातातोंडाशी आलेली 600 केळींच्या झाडांची बाग नष्ट

वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलिस स्टेशन हद्दीतील घटना

Pune: संत तुकाराम महाराज यांची पालखी निवडुंग विठोबा मंदिरात मुक्कामी

पुणे -

संत तुकाराम महाराज यांची पालखी निवडुंग विठोबा मंदिरात मुक्कामी

तुकाराम महाराजांच्या पादुकांच दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

पहाटे पासून मंदिरात दर्शन घेण्यासाठी मोठी रीघ

पालखी सोहळा असल्याने निवडुंग विठोबा मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाई ने सजवले

Buldhana: बुलडाण्यात विहिरीत पडून नीलगायीचा मृत्यू

बुलढाणा -

विहिरीत पडून नीलगायीचा मृत्यू

वनविभागाच्या कथित बेजबाबदार भूमिकेवर संताप

सुलज शिवारातील घटना

RFO यांच्या हस्तक्षेपानंतर मृतदेह बाहेर काढून पंचनामा व दफन..

Ratnagiri: परशुराम घाटा गॅबियन वॉलला तडे, दरड कोसळण्याची भीती

रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली, तरी गेल्या चार-पाच दिवसांच्या मुसळधार पावसाचे परिणाम आता समोर येत आहेत.

परशुराम घाटाच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉलखालील माती मोठ्या प्रमाणात सरकली असून, पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या संरचनेला तडे गेले आहेत.

पाणी वाहून नेणाऱ्या काही पायऱ्या वाहून गेल्या असून उर्वरित पायऱ्यांनाही भेगा पडल्याने घाटात दरड कोसळण्याचा धोका पुन्हा वाढला आहे.

Buldhana: बुलडाण्यात शिक्षकांचे राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन

बुलढाणा -

शिक्षकांचे राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शिक्षकांचा मोर्चा

अशैक्षणिक कामांपासून सुटका करण्याची प्रमुख मागणी

‘टीईटी,पदोन्नती विषयक अन्यायकारक अटी रद्द करा’.

Washim: गतवर्षीच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात पावसात तब्बल 137.6 मिली मीटरची तूट

वाशिम -

गतवर्षीच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात पावसात तब्बल 137.6 मिली मीटरची तूट

वाशिम जिल्ह्यात यंदा पावसाचा वेग गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे.

कालपर्यंत अखेर जिल्ह्यात 166.7 मिमी पावसाची नोंद झाली असून, गेल्यावर्षी याच दिवसापर्यंत 304.3 मिमी पाऊस कोसळला होता.

यावरून जिल्ह्याच्या पर्जन्यमानात आतापर्यंत 137.6 मिली मीटरची तूट निर्माण झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

Pune: बिबट्याच्या अवयवांची तस्करी, पुण्यातील संगमवाडीत वनविभागाचा सापळा

पुणे -

बिबट्याच्या अवयवांची तस्करी

पुण्यातील संगमवाडीत वनविभागाचा सापळा

जुन्नरच्या दोन तस्करांकडून बिबट्याचे कातडे, १५ नखे अन् सुळे जप्त

पुणे आणि परिसरात वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा वनविभागाने केला पर्दाफाश

Yavatmal: स्मार्ट मीटर बसण्याआधीच 5 महिन्यांचे वीज बिल, स्मार्ट मिटरच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह

यवतमाळ -

स्मार्ट मीटर बसण्याआधीच पाच महिन्यांचे वीज बिल

स्मार्ट मिटरच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह

महावितरणच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

बाभुळगांव तालुक्यातील नांदुरा खूर्द येथील धक्कादायक प्रकार

Tulajapur: तुळजाभवानी देवस्थानच्या इनामी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समीतीची स्थापना

धाराशिव -

तुळजाभवानी देवस्थानच्या इनामी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समीतीची स्थापना

समीतीला 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

चौकशी समितीच्या अध्यक्षपदी पदी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांची नियुक्ती तर उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख व शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांचा समीतीमध्ये समावेश

महाराष्ट्र मंदीर महासंघाच्या आरोपावरून महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते चौकशी समीती नेमण्याचे आदेश

Nashik: गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढला, तरी नाशिकमधील पाणीकपात कायम

नाशिक -

- गंगापूर धरणातील पाणीसाठा वाढला, तरी नाशिकमधील पाणीकपात कायम

- ३ दिवसांच्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा ३२ टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत

- मात्र धरणात ७५ टक्के साठा झाल्यानंतरच पाणीकपात रद्द होणार

- नाशिक महापालिकेचा सध्याचा आठवड्यातून एक दिवस पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

- ऑगस्टमधील वाढीव पाणीकपातीपासून नाशिककरांना दिलासा मिळण्याची शक्यता

- धरणातील पाणीसाठा आणि पावसाच्या स्थितीवर महापालिकेचे सातत्याने लक्ष

Nagpur: हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या नावाने सोशल मीडियावर भाविकांची आर्थिक फसवणूक

नागपूर

- देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या नावाने सोशल मीडियावर भाविकांची आर्थिक फसवणूक

- फेसबुक वर 'ताज बाबा नागपूर' या नावाने अकाउंट चालवले जात असून त्यावर संबंधित फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जात आहे

- फॉलोवर्सना 169 रुपये भरून होण्याचे आवाहन केले जात आहेत....

Pune - संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात उत्साहात आगमन

पुणे -

- संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात उत्साहात आगमन झाले

- रात्रीच्या अंधारात प्रकाशमयी लखलखाटात ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने पुणेकर वारकऱ्यांच्या भक्तीभावाचे साक्षीदार झाले

- या सोहळ्याची पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातील विहंगम ड्रोन दृश्य

Nashik: साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवींचं मंदिर आजपासून दर्शनासाठी खुलं

नाशिक -

- साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवींचं मंदिर आजपासून दर्शनासाठी खुलं

- सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी देवींचं मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुलं

- नाशिक जिल्ह्यात पावसानं उघडीप दिल्यानंतर आजपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्याचा निर्णय

- मुसळधार पावसाच्या अलर्टमुळे मंदिर ३ दिवसांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं बंद

- तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळा देखील नियमितपणे भरणार

Yavatmal: सोयाबीनचं बियाणे निघालेच नाहीये, शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट

यवतमाळ -

सोयाबीनचं बियाणे निघालेच नाहीये, शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट

बोगस बियाणामुळे शेतकरी वर्ग संकटात

संबंधित कंपनीची चौकशी करून दोषींवर कारवाई करा

Nanded: नांदेडमध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा मोठा साठा जप्त

नांदेडमध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा मोठा साठा जप्त

FDA आणि नांदेड पोलिसांची संयुक्त कारवाई

शहरातील मन्यार गल्ली येथून 50 ते 60 लाखाची सौंदर्य प्रसाधने जप्त, एक जण ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamilnadu Government: शाळेत विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी, 'या' राज्य सरकारचा मोठा निर्णय

Karna Mahabharata: महाभारतात कर्णाला कोणकोणते शाप मिळाले होते?

Maharashtra News Live Update: 'वंदे मातरम्' विधेयक लोकसभेमध्ये मंजूर

तुम्ही लपून राहू शकत नाही, एक दिवस आम्ही तुम्हाला बाहेर आणू; मल्लिकार्जुन खरगेंचा PM मोदी-अमित शाहांना इशारा

शाळांमध्ये कोणत्या पदार्थांवर बंदी, वाचा संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT