Palghar News Saam tv
महाराष्ट्र

Palghar News : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; पालघरच्या अस्वाली धरणातील घटना

Palghar news : पालघरमध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरली आहे

रुपेश पाटील

पालघर : मित्रांसोबत पालघरच्या अस्वाली धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी सदर तरुणाचा मृतदेह शोधून बाहेर काढला.

पालघरमध्ये (Palghar News) मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरली आहे. या दरम्यान चारही बाजूने जंगल असल्याने अस्वली धरणात तरुण निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक नसल्याने या धरणात अनेक वेळा अशा दुर्घटना घडून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याच चित्र आहे. अशीच घटना पुन्हा एकदा घडली आहे. 

दरम्यान तलासरीच्या बोरीगाव येथील मार्मिक कोळी (वय २६) हा आपल्या मित्रांसोबत धरणात पोहण्यासाठी गेला होता. मात्र धरणात उलटून वाहणाऱ्या पाण्यात पोहत असताना तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेबाबत सोबत असलेल्या मित्रांनी गावात माहिती दिली. यानंतर स्थानिक त्यांच्या मदतीने काल उशिरा मार्मिक चा मृतदेह शोधण्यात पोलीस प्रशासनाला यश आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अधिकाऱ्यांना मारले, आता फेरीवाले आम्हाला पण मारणार, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची महासभेत विनवणी

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT