Palghar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Palghar Crime: पालघर हादरलं! माय-लेकीला संपवलं, मृतदेह दगडाला बांधून नाल्यात फेकला, दीर-नणंद निघाले मारेकरी

Mother And Daughter Killed In Palghar: पालघरच्या सावरे गावाजवळील एका नाल्यामध्ये दोन जणांचे मृतदेह दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. हत्या करून त्यांचे मृतदेह नाल्यात फेकण्यात आले होते.

Priya More

पालघरमध्ये माय-लेकीची निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह नाल्यामध्ये फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालघर तालुक्यातील सावरे गावामध्ये ही घटना घडली. माय-लेकींचे मृतदेह नाल्यामध्ये तरंगताना दिसल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिस तपासामध्ये या दोघींची हत्या झाल्याचे समोर आले. या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या सावरे गावाजवळील एका नाल्यामध्ये दोन जणांचे मृतदेह सोमवारी दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. गावातील नागरिकांना तलावामध्ये दोघींचे मृतदेह दिसले त्यामुळे खळबळ उडाली. त्यांनी यासंबधी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींचे मृतदेह बाहेर काढले. तर ते मृतदेह वाणीपाडा येथील सुष्मिता प्रवीण डावरे यांचा असल्याचे समोर आले. सुष्मिता यांच्यासोबत त्यांच्या मुलीचा मृतदेह देखील हत्या करून दगडाला बांधून या नाल्यामध्ये फेकण्यात आला होता.

मनोर पोलिसांनी दोघींचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले. याप्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना सुष्मिता डावरे यांच्या दीरावर संशय आला. पोलिसांनी संदीप डावरे याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. त्याने दोघींची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी दगडाला बांधून नाल्यामध्ये फेकल्याचे कबूल केले. महत्वाचे म्हणजे या हत्याकाडांमध्ये संदीपची बहीण सुमन देखील सहभागी होती. पोलिसांनी तिला देखील अटक केली आहे. एक आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध धेत आहे.

हत्या करण्यात आलेल्या सुष्मिता डावरे या आपल्या पती आणि दीड वर्षांच्या मुलीसोबत शेतघरामध्ये राहत होत्या. जमिनीच्या वादातून त्यांची आणि मुलीची हत्या करण्यात आली. आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, ३१ ऑगस्टला सुष्मिता आणि संदीप यांच्यामध्ये जमिनीवरून वाद झाला होता. सुष्मिता रात्री फोनवर बोलत होत्या. त्यावेळी आरोपीने पाठीमागून तिच्यावर हल्ला करत हत्या केली. त्यानंतर तिच्या मुलीची देखील हत्या केली. दोघींचे मृतदेह पिशवीमध्ये टाकून त्याला दगड बांधून त्याने नाल्यामध्ये फेकले. या घटनेमुळे पालघरमध्ये खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Office: भाजप मुख्यालयाबाहेर मोठा स्फोट, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं परिसर हादरला; चंदीगडमध्ये खळबळ

Fansache Cutlet Recipe : घरी 'असे' बनवा १० मिनिटांत फणसाचे कटलेट्स, एक घास खाताच पाहुणे करतील कौतुक

Bhajyanchi Amti Recipe: खान्देशी स्टाईल झणझणीत भज्यांची आमटी कशी बनवायची? पाहा ही सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: जोतिबा डोंगरावरील दक्षिण दरवाजाजवळ झाडावर वीज कोसळली

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत फूट? वाद मिटविण्यासाठी दिग्गज नेत्यांच्या बैठका, VIDEO

SCROLL FOR NEXT