Palghar Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Palghar News: जमिनीसाठी तुफान राडा! पुरूषांसह महिलांना बेदम मारहाण, ५ गंभीर जखमी; VIDEO व्हायरल

Palghar Crime News : पालघरच्या मनोरमध्ये जमिनीच्या वादातून दोन कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये ५ जण जखमी झाले असून त्यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे.

Priya More

रूपेश पाटील, पालघर

पालघरमध्ये जमिनीच्या वादातून तुफान राडा झालाय. पालघरच्या नागझरी येथे ही घटना घडली. दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. मनोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नागझरी गावामध्ये हा प्रकार घडला आहे. कौटुंबिक वादातून हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत महिलांना देखील बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत जखमी झालेल्या महिलांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर तालुक्यातील नागझरी गावात जमिनीच्या वादातून महिलांना लोखंडी रॉडने मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीत ३ महिला महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. विणा विश्राम अधिकारी, रंजना हरेश्वर अधिकारी, सविता तुळशिराम अधिकारी या महिला गंभीर जखमी झाल्यात. तर या मारहाणीमध्ये समीर विश्राम अधिकारी, तुळशिराम बाबू अधिकारी यांना देखील अमानुष मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी आरोपी निराथाय नाशिक पावडे, जयेश नाशिक पावडे, नितेश सिताराम पावडे, प्रदिप सिताराम पावडे, महेश सदानंद पावडे, निलेश सदानंद पावडे यांच्याविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त जमिनीचा निकाल पीडित कुटुंबाच्या बाजूने लागून आरोपींना मनाई हुकूम असताना देखील त्यांनी जबरदस्तीने जागेत प्रवेश केला आणि मारहाण केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोलिस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT