Palghar Police Saam tv
महाराष्ट्र

Palghar Police : पालघर पश्चिम किनारपट्टीवर अलर्ट; पोलीस बंदोबस्त तैनात, गाड्यांची तपासणी

palghar news : पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाल्यानंतर भारताकडून ऑपेरेशन सिंदूर राबविण्यात आले. यानंतर पाकिस्तानकडून भ्याड हल्ले करण्यात येत आहेत. याला भारताकडून देखील प्रतिउत्तर दिले जात आहे

रुपेश पाटील

पालघर : भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरु झाले असून देशात ठिकठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर देखील सुरक्षितेच्या दृष्टीने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणाहून जाणाऱ्या व येणाऱ्या प्रत्येक गाड्यांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हॉटेलची देखील तपासणी केली जात आहे. 

जम्मू- काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाल्यानंतर भारताकडून ऑपेरेशन सिंदूर राबविण्यात आले. यानंतर पाकिस्तानकडून भ्याड हल्ले करण्यात येत आहेत. याला भारताकडून देखील प्रतिउत्तर दिले जात आहे. दरम्यान पाकिस्तानकडून सध्या देशात भ्याड हल्ले केले जात असल्याने सतर्क झालेल्या पालघर पोलिसांनी पश्चिम किनारपट्टीवरील ८३ किलोमीटरच्या परिसरात ३८ लँडिंग पॉईंटच्या ठिकाणी चौक बंदोबस्त तैनात केला आहे. 

वाहनांसह हॉटेल, लॉजची तपासणी 

देशात अलर्ट जारी करण्यात आल्याने पश्चिम किनारपट्टी लगतच्या सर्व तपासणी नाक्यावर सध्या पोलिसांकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. तर तपासणी नाक्यांसह पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या हॉटेल आणि लॉजची देखील कसून तपासणी पालघर पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. 

पोलीस प्रशासनाकडून आवाहन 

दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच समाज माध्यमाचा काळजीपूर्वक वापर करावा; असं आवाहन पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पालघरच्या नागरिकांना केला आहे. तसेच काही संशयित हालचाली दिसून आल्यास पालघर पोलिसांनी दिलेल्या ११२ या नंबरला माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावं असं देखील यावेळी बाळासाहेब पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT