Palghar News Saam tv
महाराष्ट्र

Palghar News : वर्गखोली नसल्याने झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे; डहाणू तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Palghar News : मागील वर्षी एप्रिल महिन्यात या शाळेतील एक वर्ग खोली धोकादायक असल्याने तोडून जमीनदोस्त करण्यात आली. तर दुसऱ्या वर्गखोलीच्या दुरुस्तीचे काम मागील महिनाभरापासून हाती घेण्यात आले आहे.

रुपेश पाटील

पालघर : शाळेला वर्ग खोल्या नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क उघड्यावर शिक्षण घ्यावं लागत असल्याचा धक्कादायक प्रकार (Palghar) पालघरमधील डहाणू तालुक्यात समोर आला आहे. यामुळे पालघर जिल्हा परिषद आणि (Zilha Parishad) जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (Tajya Batmya)

पालघर जिल्ह्यातील डहाणू (Dahanu) तालुक्यातील आंबेमोरा येथील जिल्हा परिषदेच्या पहिली ते पाचवी पर्यंतच्या प्राथमिक शाळेत ४९ विद्यार्थी शिक्षण घेतात. मागील वर्षी एप्रिल महिन्यात या शाळेतील (Zp School) एक वर्ग खोली धोकादायक असल्याने तोडून जमीनदोस्त करण्यात आली. तर दुसऱ्या वर्गखोलीच्या दुरुस्तीचे काम मागील महिनाभरापासून हाती घेण्यात आले आहे. मात्र मागील एक महिन्यापासून विद्यार्थ्यांना वर्ग खोलीच नसल्याने हे चिमुकले विद्यार्थी मागील महिनाभरापासून जंगला शेजारी एका झाडाखाली शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जंगलाजवळ गाव 

पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार या अशा प्रकारमुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आंबेमोरा हे गाव जंगलाशेजारी असल्याने येथे कुत्र्यांसह सापांचीही मोठी भीती आहे. मात्र असं असताना देखील हे विद्यार्थी झाडांखाली शिक्षण घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भात तापमान ४५ पेक्षा जास्त

AAP: 'न्याय मिळण्याची अपेक्षा संपली'; केजरीवालांचा न्यायाधीशांच्या निष्पक्षतेवरच सवाल

यंदा उष्माघातानं लाखो बळी जाणार? जगावर पुन्हा 'सुपर एल निनो'चं संकट?

Investment Scheme:भरघोस रिटर्न्ससाठी सरकारची नवी योजना? 22 हजार गुंतवा, साडेतीन लाख कमवा?

IPL 2026 मधील सर्वात जबरदस्त सामना; अवघ्या ३९ चेंडूंत RCBने मिळवला विजय,पॉईंट्स टेबल बेंगरुळुची भरारी

SCROLL FOR NEXT