Mns Office Clash In Palghar: Former City Chief Sunil Raut Injured As Factional Fight Erupts AI
महाराष्ट्र

मनसेच्या कार्यालयात तुंबळ हाणामारी; राऊत यांना बेदम मारहाण, तालुकाध्यक्षावरही हल्ला

Violence Erupts at MNS Meeting in Palghar: पालघरमधील मनसेच्या पक्ष कार्यालयात दोन गटांमधील वादामुळे हिंसाचार उसळला. यात शहराचे माजी प्रमुख सुनील राऊत जखमी झाले असून, मारहाणीच्या आरोपांमुळे राजकीय वाद अधिकच तीव्र झाला आहे.

Bharat Jadhav

  • पालघरमधील मनसे कार्यालयात बैठकीदरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

  • माजी शहराध्यक्ष सुनील राऊत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • सुनील राऊत यांनी जिल्हाप्रमुख समीर मोरे यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे.

रुपेश पाटील, साम प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत गटबाजी आता उघडपणे समोर आली आहे. पालघर येथील मनसे कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नियोजित बैठकीदरम्यान दोन गट आमनेसामने आल्याने जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत मनसेचे माजी शहराध्यक्ष सुनील राऊत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पालघरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान काही मुद्द्यांवरून वादाला सुरुवात झाली. हा वाद काही वेळातच विकोपाला गेला आणि दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की तसेच मारहाण झाली. या हाणामारीत सुनील राऊत यांना गंभीर दुखापत झाली.मारहाणीनंतर सुनील राऊत यांनी मनसेचे जिल्हाप्रमुख समीर मोरे यांनी आपल्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच या घटनेत मनसेचे तालुकाध्यक्ष संदीप किणी यांनाही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पालघरमधील मनसेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनील राऊत यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवले जात आहे.या घटनेमुळे मनसेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, पक्ष नेतृत्व या प्रकरणाची दखल घेणार का, याकडे कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पक्षाच्या कार्यालयातच हाणामारीची घटना झाल्यानं परिसरात खळबळ माजलीय.

रायगडमध्ये मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

राज ठाकरेंच्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्याआधीच मनसेला मोठा धक्का बसलाय. जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मनसे माजी रायगड संपर्क अध्यक्ष दिलीप सांगळे, विद्यार्थी सेना रायगड जिल्हा अध्यक्ष प्रतिक रहाटे, रोहा तालुका अध्यक्ष बाबू फुलारे, माथाडी अध्यक्ष राजा टेंबे या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांनी पक्षातील पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT