Jawhar News Saam tv
महाराष्ट्र

Jawhar News : आश्रम शाळेतील बारावीच्या विद्यार्थीनीनं संपवले जीवन; २ महिन्यांत १० विद्यार्थ्यांचा मृत्यू

Palghar News : जून महिन्याच्या शेवटी शाळा व आश्रम शाळा सुरू झाल्या. मात्र आश्रम शाळा सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत एकट्या जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेत १० विद्यार्थ्यांचे मृत्यू

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. यात आणखी एका विद्यार्थिनींची भर पडली असून दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. 

जून महिन्याच्या शेवटी शाळा व आश्रम शाळा सुरू झाल्या. मात्र आश्रम शाळा (Ashram School) सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत एकट्या जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेत १० विद्यार्थ्यांचे मृत्यू झाल्याचे शासकीय आकडेवारीनुसार समोर आले आहे. आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे; म्हणून शासनाने आदिवासी आश्रम शाळेची निर्मिती केली. (Palghar) आश्रम शाळा सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात आदिवासी मुलांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. एका आश्रम शाळेत ५०० ते १ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या करिता शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र आलीकडे आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. 

जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या देहरे, पलसुंडा, साकुर, विनवल, खुडेद अशा अनेक आश्रम शाळेत १० विद्यार्थ्यांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आश्रम शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. यात कन्या आश्रम शाळा साकुर येथील दहावीच्या वर्गात शिकणारी शुभांगी रामदास पागी (वय १८) या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र तिने टोकाचे पाऊल कोणत्या कारणाने उचलले याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. याबाबत पोलिसांकडून आता तपास सुरु करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: :- बीड येथे 45 लाखाची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या नांदेडच्या निवासस्थानी एसीबीचे पथक दाखल.

Corn Silk Tea : मक्याच्या केसांचा चहा कधी प्यायलात का? किडनीपासून शुगरपर्यंत आजार होतील दूर

Pune University: पुणे विद्यापीठाचा बोगस डिग्री घोटाळा 'साम टीव्ही'नं केला उघड; रिपोर्टर सागर आव्हाडांच्या धाडसाचं होतंय कौतुक

Saturday Horoscope : मनात राग ठेवू नका, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदी; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Water Intake: वय, वजन आणि ऋतूनुसार बदलते पाण्याची गरज; जाणून घ्या दिवसभरात किती पाणी प्यावं?

SCROLL FOR NEXT