A family in Palghar waits on their rooftop with a wrapped dead body for hours amid severe flooding caused by heavy rains. saam tv
महाराष्ट्र

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Palghar Flood Tragedy Exposes Administrative Failure: पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली... मात्र याचं पुरस्थितीमुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघड झालाय...पुरस्थितीत एका कुटुंबावर मृतदेह चार तास छतावर ठेवण्याची वेळ ओढावली... नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

काळीज पिळवटून टाकणारी ही दृश्य नीट पाहा... घराच्या छतावर मृतदेह ठेवून मुसळधार पाऊस थांबण्याची वाट पाहणारे हे आहे लिलका कुटुंब...पालघर जिल्ह्यातील केळवे रोड परिसरात मुसळधार पावसानंतर पुरस्थिती निर्माण झाली... त्यातच लिलका कुटुंबातील अनुसया लिलका यांचा रुग्णालयात उपचारानंतर मृत्यू झाला..मात्र पुरस्थितीमुळे रुग्णवाहिका रेल्वे अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यातून पुढे जाऊ शकली नाही.... अखेर कुटुंबानं नातेवाईकांच्या मदतीनं त्या माऊलीचा मृतदेह खांद्यावर घेतला आणि कसाबसा पुराच्या पाण्यातून मार्ग काढत घर गाठलं. वाटलं होतं, आता तरी या माऊलीवर अंत्यसंस्कार सुरळीत होतील. मात्र देवीपाडा येथील लिलका कुटुंबीयांच्या घरात पाणी भरलं होतं...कुटुंबीयांनी घराच्या किचनमधील छताचे दोन सिमेंटचे पत्रे फोडले आणि मोठ्या कष्टानं मृतदेह छतावर नेला...प्लास्टिकनं गुंडाळलेल्या मृतदेहासोबत लिलका कुटुंबीयही तब्बल 4 तास छतावर बसून पाणी ओसरण्याची वाट पाहू लागले...

दुसरीकडे याच परिसरात मुसळधार पावसात एका लहान चिमुकल्यांसह 8 जणांचं कुटुंब तब्बल चार तास छतावर अडकून पडलं होतं. चोहोबाजूंनी पाण्याने वेढा घातल्यामुळे चिमुकली मुलं भर पावसात छतावर थरथर कापत मदतीची वाट पाहत होती. मात्र तब्बल चार तास उलटूनही या कुटुंबाला कोणतीही प्रशासकीय मदत मिळाली नसल्याचा गंभीर आरोप या कुटुंबाने केलाय...

पालघरमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधीची तरतूद केली जाते. मात्र प्रत्यक्षात त्याचं काय होतं हे छतावरच्या मृतदेहानं दाखवून दिलंय. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन नेमकं कुठे हरवलंय.? आणि ढिम्म प्रशासन नागरिकांनी आणखी किती नरकयातना भोगावला लावणार हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

Famous Singer Death: भारतीय संगीत विश्वाचा जादुई आवाज हरपला; ज्येष्ठ गायिका काळाच्या पडद्याआड

रस्त्यावर हजारो विषारी साप, पुराच्या पाण्यात सापांचा सुळसुळाट

Maharashtra News Live Update: आमदार जयंत पाटलांना धक्का; ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद रद्द

SCROLL FOR NEXT