Palghar Earthquake News AI Image
महाराष्ट्र

Palghar Earthquake: पालघर पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, नागरिकांची घराबाहेर धाव; परिसरात भीतीचे वातावरण

earthquake tremors in Talasari Dahanu Palghar: पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. तलासरी, धुंदलवाडी, मोडगाव आणि कासा परिसरात भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक प्रचंड घाबरले.

Priya More
  • पालघरमध्ये ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला

  • तलासरी, धुंदलवाडी, मोडगाव आणि कासा परिसरातील नागरिक घाबरले

  • भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली

रुपेश पाटील, पालघर

पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. आज पुन्हा पालघर जिल्ह्यातील ४ ठिकाणी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजून १६ मिनिटांच्या दरम्यान ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपचा धक्का बसला. भूकंपाच्या धक्क्याने जमीन हादरली त्यामुळे नागरिक प्रचंड घाबरले. सर्व नागरिक घराबाहेर पळाले. सध्या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात सव्वा सातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. जिल्ह्यातील तलासरी, धुंदलवाडी, मोडगाव आणि कासा परिसरात भूकंपाचे हादरे बसले. यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गेल्या कित्येक वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात सौम्य ते जास्त तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसत असून नागरिक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. या परिसरातील नागरिकांमध्ये भूकंपाबाबतची चिंता कायम आहे.

गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक जमीन हादरल्याचा अनुभव परिसरातील नागरिकांना आला. काही ठिकाणी घरांमध्ये तसेच परिसरात कंपन जाणवल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले त्यांनी घाबरून तात्काळ घराबाहेर धाव घेतली. पालघर जिल्ह्याच्या डहाणू आणि तलासरी पट्ट्यात भूकंपाच्या घटनांची वारंवारता लक्षात घेता प्रशासनाने या परिसरातील भूकंपाच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

वारंवार जाणवणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, ३.७ रिश्टर स्केलचा हा धक्का सौम्य स्वरूपाचा असला तरी वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कधी दिवसा तर कधी रात्री तर कधी मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे नागरिकांची भीती वाढत चालली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल गांधींचे बेधडक आंदोलने, आता पर्यंत किती अन् कोणते गुन्हे दाखल? प्रत्येक FIR माझ्यासाठी मेडल'

Friday Horoscope : करिअरमध्ये नवी संधी अन् बक्कळ कमाई, 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा शुक्रवारचं राशिभविष्य

Almonds vs Pistachios for Heart: बदाम की पिस्ता, हेल्दी हार्टसाठी कोणतं ड्रायफ्रुट बेस्ट?

Weather Update: वादळासह मुसळधार पाऊस; मॉन्सून परतीच्या काळात हवामान विभागाचा 14 राज्यांसाठी अलर्ट

ज्ञानेश कुमारांविरोधात ध्रुव राठी मैदानात, मुंबईनंतर बंगळुरूत सीजेपीचं आंदोलन

SCROLL FOR NEXT