Dahanu News Saam tv
महाराष्ट्र

Dahanu News : खेळताना पाण्याच्या टाकीवरून पडून दोन मुलींचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा दाखल

Palghar News : गावातील तीन मुली खेळण्यासाठी जल जीवन मिशन योजनेच्या टाकीवर चढल्या होत्या. खेळत असताना तीन मुलींपैकी कठडा तुटून पडलेल्या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक मुलगी गंभीर जखमी झाली

रुपेश पाटील

पालघर : गावात बांधल्या जात असलेल्या जलजीवन मिशनच्या टाकीवर चढून खेळत असलेल्या दोन मुलींचा पडून मृत्यू झाल्याची घटना  पालघरच्या डहाणू तालुक्यातील सुखड आंबा शिरसोन पाडा येथे घडली होती. या मृत्यू प्रकरणात आता कासा पोलीस ठाण्यात टाकीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेल्या सुखद आंबा शिरसोन पाडा याठिकाणी दोन दिवसांपूर्वी सदरची घटना घडली होती. या घटनेत गावातील तीन मुली खेळण्यासाठी जल जीवन मिशन योजनेच्या टाकीवर चढल्या होत्या. खेळत असताना तीन मुलींपैकी कठडा तुटून पडलेल्या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

ठेकेदारावर गुन्हा दाखल 

दरम्यान या दुर्घटनेनंतर ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या पालघर मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली होती. काल रात्री उशिरा ठेकेदार हरीश बोरवेल याच्या विरोधात विविध कलमान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

निकृष्ट कामाचा प्रश्न ऐरणीवर 

सदरच्या दुर्घटनेनंतर जलजीवन मिशन योजनेच्या निकृष्ट कामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यात जिल्हाभरातील जलजीवन मिशन योजनेची काम निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करत सर्व कामांची तपासणी करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी केली आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन आता याबाबत काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT