Palghar Accident Saam TV
महाराष्ट्र

Palghar Accident: इमारतीला रंग मारताना कामगारांना बसला विजेचा झटका; एकाचा जागीच मृत्यू, १ जखमी

Ruchika Jadhav

Boisar News:

पालघरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन कामगारांना विद्युत तारांचा शॉक लागलाय. विद्युत प्रवाह जास्त असल्याने त्यांना जोरदार झटका बसला. या घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बोईसरच्या ओसवालमधील सत्यम या इमारतीच्या रंगरंगोटीचे काम सुरू असताना उंचावर असलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत संदेश गोवारी या कामगाराचा मृत्यू झाला. तर उत्तम सातवी हा कामगार गंभीर जखमी झाला आहे. जखमी कामगारावर साईलीला हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, बोईसरमध्ये कारखान्यांसह परिसरात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी आणि सामग्री न वापरल्याने अशा दुर्घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. संबंधित विभाग मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे संतापले; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा

Beed Crime : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; फरार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss Grand Finale : 'तौबा-तौबा' अन् 'झापुक झुपूक'ची रंगणार जुगलबंदी; अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

Durga Ashtami 2024 : नवरात्रीत अष्टमीला बनतोय महासंयोग; 'या' ४ राशी बनणार गडगंज श्रीमंत

Upcoming Marathi Movie 2024: ऑक्टोबर महिन्यात बॉक्स ऑफिसवर चित्रपटांचा गाजावाजा, कोणता चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर?

SCROLL FOR NEXT