Palghar Crime Saam tv
महाराष्ट्र

Palghar Crime : जमिनीच्या वादातून मोठ्या भावाची हत्या; पाच महिन्यांपासून फरार मुख्य आरोपी अखेर ताब्यात

Palghar News : पालघर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी असलेले अशोक धोडी यांचे १९ जानेवारीला अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. यामुळे पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली होती

रुपेश पाटील

पालघर : शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण आणि हत्या झाल्याची घटना पाच महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणात पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र या प्रकरणातील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपी अविनाश धोडी याला अटक करण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आले आहे. 

पालघर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी असलेले अशोक धोडी यांचे १९ जानेवारीला अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. यामुळे पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी तपास करत प्रकरणातील पाच आरोपींना त्याचवेळी अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य सूत्रधार असलेले आरोपी आणि मयत अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी हा मागील पाच महिन्यांपासून फरार होता. 

जमिनीच्या वादातून केली होती हत्या 

जमिनीच्या तसेच इतर वादातून अविनाश धोडी याने आपला मोठा भाऊ आणि शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या केली होती. हत्येनंतर तपासासाठी पोलीस चौकीत बोलावलं असता मुख्य आरोपी अविनाश धोडी हा पोलीस चौकीतून पसार झाला असून मागील पाच महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. घटनेनंतर फरार असलेला अविनाश धोडी याला अखेर काल मध्यरात्री साडे तीन वाजताच्या सुमारास सेलवास मधील मूर्खंद येथून अटक करण्यात आली आहे.  


ड्रग्ज तस्करी 20 आरोपी अटक तर 17 आरोपी अद्यापही फरारच
तुळजापूर : तुळजापुर येथील ड्रग्स तस्करी प्रकरणात विनोद गंगणे याला ९ जुनपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी ७ दिवसाच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. दरम्यान न्यायालयाने सोमवारपर्यंत कोठडी सुनावली आहे. १४ फेब्रुवारी रोजी तामलवाडी येथुन ड्रग्ससह तिघांना ताब्यात घेतल्यानंतर ड्रग्स तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आले होते. यामध्ये मुंबई पुण्यासह सोलापूर कनेक्शन समोर आले. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत २० आरोपी अटक केले असुन १७ आरोपी फरार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

SCROLL FOR NEXT