Palghar Saam
महाराष्ट्र

Palghar: 'जिल्हाधिकारी कार्यालायत बॉम्ब' निनावी ई-मेलनंतर पालघर पोलीस अलर्ट मोडवर

Palghar Bomb Threat: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी ई- मेलद्वारे देण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान, परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी ई- मेलद्वारे देण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या मेलनंतर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय तत्काळ रिकामं करण्यात आलं असून, परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या संपूर्ण इमारतीची झडती घेण्याचं काम सुरू आहे.

सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात एक निनावी ई-मेल पाठवण्यात आला होता. या ई - मेलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय संकुलात बॉम्ब ठेवला असल्याची माहिती देण्यात आली. ई -मेल प्राप्त झाल्यानंतर फसवा असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात ई -मेल खरा असल्याचं समोर आलं.

त्यानंतर सर्व कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांना संकुलाबाहेर सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. धमकीच्या ई-मेलची माहिती मिळताच बॉम्ब शोध पथक, डॉग स्क्वॉड आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. तसेच संपूर्ण इमारतीची झडती घेण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय पोलिस छावणीत बदलल्याचे चित्र पाहायला मिळालं. सध्या तपास यंत्रणा मेलचा स्त्रोत आणि धमकीचे खरे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ही धमकी खरी आहे की खोटा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी माहिती देताना सांगितले की, "हा ई-मेल निनावी असून त्यामध्ये बॉम्ब ठेवल्याची स्पष्ट सूचना आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून सर्व संबंधित यंत्रणा कार्यरत करण्यात आल्या आहेत." प्राप्त झालेल्या निनावी ई -मेलनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

Satara: महामार्गावर अपघाताचा थरार! रस्ता ओलांडणाऱ्यांना बसने चिरडलं, एकाचा मृत्यू; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Shivali Parab Photos : "तुम्हारी अदा भी क्या खूबसूरत है..."; शिवालीला पाहून चाहत्यांची विकेट पडली

Watch: धक्कादायक! खेळताना बास्केटबॉलचा पोल अंगावर कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू

Monkey: माकडांना पकडा अन् ६०० रुपये मिळवा; राज्य सरकारकडून निर्देश जारी

SCROLL FOR NEXT