Palghar Wada News Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : हिरकणी बसचा भीषण अपघात, ४० विद्यार्थी जखमी

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

वाडा (पालघर) : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी राज्य परिवहन महामंडळाची हिरकणी बसचा अपघात झाला आहे. चढाव चढत असताना बस बंद पडली. यात ब्रेक फेल झाल्याने बस उलट्या दिशेने येत पलटी झाली. या अपघातात बसमधील ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

पालघर (Palghar) जिल्ह्यातील वाडा आगाराची हिरकणी बस वाडा बसस्थानकातून आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन मार्गस्थ झाली. बस वाड्याहून आमगावच्या दिशेने जात असताना कुमदल गावा जवळील असलेला चढाव चढत असताना बस असताना बंद पडली व मागे येऊ लागली. यावेळी बस चालकाने ब्रेक दाबला असताना ब्रेक फेल झाले होते. यामुळे बस मागे उताराला आल्याने पलटी (Bus Accident) झाली. या बसमध्ये एकूण ४० विद्यार्थी प्रवास करत होते. हे सर्व विद्यार्थी जखमी झाले आहे. 

पालक वर्ग संतप्त 

सर्व जखमी विद्यार्थ्यांवर वाडा येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात असून भंगार बस असून यामधून विद्यार्थी प्रवास करतात. महामंडळने चांगल्या दर्जाचे बस उपलब्ध करून द्यावे. तसेच बस डेपोतून निघताना बस पुर्णपणे तपासली जाते. मग बसचा ब्रेक फेल झाला कसा? असा संतप्त सवाल पालक करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MVA seat Sharing : मविआत मित्रपक्षांची 40 जागांची मागणी? कोणत्या पक्षाला कुठली जागा हवीय?

Marathi News Live Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची बांधण्यात आली पहिली सालंकृत पूजा

Badlapur BJP Meeting News : भाजपच्या बैठकीत गोंधळ, आमदार आणि माजी खासदारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? VIDEO

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते निवडणुकीच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंना देणार तगडं आव्हान

Operation Blunder : ती एक चूक आणि काँग्रेसला नवसंजीवनी; काय आहे ‘ऑपरेशन ब्लंडर'? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT