Palghar Accident News
Palghar Accident News  Saam tv
महाराष्ट्र

Palghar Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; ट्रकने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

Palghar News : पालघरमधून भीषण अपघाताची मोठं वृत्त हाती आलं आहे. पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकीवरील तिघांना ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. मुंबई-महामार्गावर चारोटी एशियन पेट्रोल येथे हा भीषण अपघात झाला आहे. या तिन्ही दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-महामार्गावर डहाणुतील (Dahanu) चारोटी या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे . दुचाकीवर ट्रिपल सीट असताना रस्ता ओलांडताना हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वारांना थेट १०० मीटरपेक्षा अधिक अंतर फरफटत नेलं.

अपघातात (Accident) मृत्यूमुखी पडलेले तिन्ही दुचाकीस्वार हे तलासरी येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही तरुणांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शासकीय रुग्णालयात हलवले आहे.

पुण्यात वाहनाने १७ महिलांना उडवलं, हृदयद्रावक घटना

पुण्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळच्या शिरोली, (ता. खेड) परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर १२ महिला जखमी झाल्या आहेत. 

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींपैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला असून (Police) त्याचा शोध घेत आहेत. या भयंकर घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : नितेश कुमारची वादळी खेळी, ठोकले ८ षटकार; हैदराबादचं राजस्थानसमोर २०२ धावांचं आव्हान

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Explainer : ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी, दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT