Jalna Sanjay Raut family Pahalgam attack Saam Tv News
महाराष्ट्र

Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये २१ एप्रिललाही दहशतवादी होते, तुम्ही हिंदू आहात का? विचारलं, पण...; जालन्यातील कुटुंबाचा दावा

Pahalgam Terror Attack Jalna Raut Family : पहलगाममध्ये असताना आदर्श राऊत एकटेच घोडेस्वारीसाठी गेले होते. ते खोऱ्यात फिरत होते. बैसरन खोऱ्यात एका मॅगीच्या स्टॉलवर थांबलेले असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला.

Prashant Patil

जालना : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यातून जालन्यातील राऊत कुटुंब थोडक्यात बचावलं आहे. जालन्यातील राऊतनगरमध्ये राहणारे संजय राऊत आणि त्यांचा मुलगा आदर्श आणि पत्नी सोबत काश्मीरला गेले होते. २१ एप्रिलला राऊत कुटुंब पहलगाममध्ये होतं. त्यावेळचा अनुभव राऊत यांनी सांगितला आहे.

पहलगाममध्ये असताना आदर्श राऊत एकटेच घोडेस्वारीसाठी गेले होते. ते खोऱ्यात फिरत होते. बैसरन खोऱ्यात एका मॅगीच्या स्टॉलवर थांबलेले असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला. 'तुम्ही काश्मिरी वाटत नाही. तुम्ही हिंदू आहात का?' असा प्रश्न अनोळखी व्यक्तीने आदर्श यांना विचारला. तेव्हा आदर्श राऊत यांना काहीसा संशय आला आणि, मी इथलाच रहिवासी असल्याचं उत्तर त्यांनी दिलं.

आदर्श यांनी समोरच्या व्यक्तीला फारसं महत्त्व दिलं नाही. त्यामुळे तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ एप्रिलला राऊत कुटुंब श्रीनगरला गेलं. त्याच दिवशी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे फोटो समोर आले. तेव्हा आदर्श यांनी त्यातील एकाला ओळखलं. त्याच व्यक्तीने आदर्श यांच्याशी बातचीत केली होती. जालन्याला परतल्यानंतर आदर्श राऊत यांनी ईमेलच्या माध्यमातून ही माहिती एनआयएला दिली. त्यात त्यांनी संशयितासोबत झालेल्या संवादाचा संदर्भ दिला.

'२१ एप्रिललादेखील दहशतवादी पहलगाममध्येच होते. पण त्यावेळी तिथे पर्यटक कमी होते. त्यामुळेच त्यांनी हल्ल्यासाठी पुढचा दिवस निवडला असावा,' अशी शक्यता आदर्श यांनी बोलून दाखवली. 'जिथे हल्ला झाला, तिथे पोलीस किंवा सुरक्षा दलाचे जवान नव्हते. तिथे सुरक्षा असती, तर हल्ला झाला नसता,' असं आदर्श यांचे वडील संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

T20 World Cup 2026: १२ वर्षांनंतर चमत्कार घडला! टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा नेपाळनं जिंकला सामना, स्पर्धेचा शेवट गोड

Hair Growth: हेल्दी, जाड अन् सिल्की केसांसाठी जास्वंदाचे तेल ठरेल सगळ्यात बेस्ट

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

SCROLL FOR NEXT