Palghar Accident News Saamtv
महाराष्ट्र

Palghar Accident News: मन सुन्न करणारी घटना! भरधाव पिकअपने बहिण- भावाला चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू, चालक फरार

अपघातानंतर पिकअप चालक पिकअप घेऊन फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

Palghar Accident News: समृद्धी महामार्गावर बुलढाणा (Buldhana Accident) येथे खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला. आज पहाटेच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

या अपघाताची घटना ताजी असतानाच पालघरमधून एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी मोडगाव येथे अपघातात दोन चिमुकल्या भावंडांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पालघर (Palghar Accident) जिल्ह्यातील तलासरी मोडगाव येथे दुर्देवी अपघाताची घटना घडली आहे. भरधाव पिकअपने रस्त्याने चालत असलेल्या दोघांना चिरडले. यामध्ये दोन चिमुकल्या भावंडांचा जागीच मृत्यू झाला.

प्रीती मालकरी (Priti Malkari) आणि शाहिद मालकरी (Shahid Malkari) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. अपघातानंतर पिकअप चालक पिकअप घेऊन फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या दुर्देवी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

भीषण अपघातात ४ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू..

दरम्यान, नाशिक (Nashik) जिल्ह्यातूनही एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिकच्या वणी सापुतारा महामार्गावर खोरी फाट्याजवळ कार आणि क्रुझरमध्ये समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

SCROLL FOR NEXT