महाराष्ट्र

Paduka Darshan Sohala 2025: वरळीमध्ये भरला 'भक्तीचा महाकुंभ'; संतांच्या पादुका दर्शनासाठी लोटला जनसागर

Paduka Darshan Sohala 2025: संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविकांनी भक्तिमय महाकुंभात हजेरी लावलीय.

Bharat Jadhav

मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयजित करण्यात आलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यात भाविकांचा महासागर उसळलाय. ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ सुरू झाल्यापासून संपूर्ण परिसर आध्यात्मिक उर्जेने भारून गेलाय. संतांच्या पादुकाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक महाकुंभात सहभागी होत आहेत.

हरिनामाचा गजर, भजनं, मनाला खिळवून ठेवणारा मृदुगचा आवाज आणि सुवासिक फुलांनी येथील परिसर प्रसन्न वाटत आहे. भक्तीभावात भाविका आपल्या देवाच्या नावाचा जयजयकार करत आहेत. भाविकांच्या ओठांवर देवाचे नामस्मरण, संत पादुकांचे दर्शन घेऊन भाविक आनंदित होत आहेत. सकाळ समुहाकडून आयोजित करण्यात आलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यात २१ संतांच्या पादुका आणण्यात आल्या आहेत.

यात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, श्री स्वामी समर्थ, संत गजानन महाराज, संत नामदेव, संत जनाबाई, सावता माळी, एकनाथ महाराज, गोंदवलेकर महाराज आणि इतर थोर गुरूंच्या पावन पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीय. संतांच्या पादुकांपुढे भाविक नतमस्तक होत आहेत.

संत पादुकांवर फुलांची अर्घ्य वाहत आहेत, काही जण डोळे मिटून ध्यानधारणा करताहेत. तर काहीजण हात जोडून संतविचारांच्या गूढ गाभाऱ्यात स्वतःला विलीन करताहेत. सोहळ्यात प्रवेश करताच शुद्ध चंदन, ऊद आणि फुलांचा मंद सुगंध भाविकांच्या मनात पावित्र्य निर्माण करतं. किर्तनाचा गजर, आणि नादब्रह्माच्या तरल लहरी पसरलेल्या आहेत. संतांच्या पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर काही भक्तांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोहळ्यात भाविकांसाठी सुविधा

भाविकांसाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे.

क्यूआर कोड नोंदणी प्रणालीद्वारे भाविकांना प्रवेश दिला जातोय.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींकरिता व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलीय.

शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि पादत्राणे ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT