padmashri laxman mane saam tv
महाराष्ट्र

धर्मनिरपेक्ष पक्षांची ताकद वाढण्याची गरज; लक्ष्मण मानेंचा उद्या राष्ट्रवादीत प्रवेश

नागपूर येथील अधिवेशनात हजारो भीमसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे लक्ष्मण माने यांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : पद्मश्री लक्ष्मण माने (Laxman Mane) हे उद्या (साेमवार) राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करणार आहेत. त्याबाबतची माहिती माने यांनी नुकतीच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. माने यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil), माजी उपमुख्यमंत्री विराेधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar)यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित मुंबईतील राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष कार्यालयात (mumbai ncp office) हाेईल. (laxman mane latest marathi news)

श्री. माने म्हणाले देशातील लोकशाही धाेक्यात आली आहे. आम्ही करु तसा कायदा म्हणजेच हिटलरशाही सारखा प्रकार इथं झाला आहे. त्यामुळे लोकशाहीला मानणणा-या पक्षांना पाठबळ देणे गरजेचे वाटते. त्यामुळे काही माेजक्या कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करीत आहाेत.

दरम्यान राजर्षी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी निमित्त ३१ ऑगस्टला नागपूर येथे भटक्या विमुक्त संघटनेचे अधिवेशन आयाेजिले आहे. काय अधिवेशनाचे प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे असून अध्यक्षस्थानी कवी डॉ. यशवंत मनोहर आहेत असेही माने यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT