Padma Shri Awardee Aranyarishi Maruti chitampalli 
महाराष्ट्र

Aranyarishi Maruti chitampalli: पद्मश्री अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे निधन

Padma Shri Awardee Aranyarishi Maruti chitampalli: मूळचे सोलापूरचे रहिवासी असलेले मारुती चित्तमपल्ली यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1932 रोजी झाला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 30 एप्रिल 2025 रोजी मारुती चित्तमपल्ली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Bharat Jadhav

विश्वभुषण लिमये,साम प्रतिनिधी

पद्मश्री पुरस्कार सन्मानित अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 वर्षी अरण्यऋषीं चित्तमपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला. 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मारुती चित्तमपल्ली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दिल्लीतून परतल्यापासूनचं ते प्रचंड आजारी होते. आज संध्याकाळी 7 च्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

वन विभागात सेवा बजावत असताना मारुती चित्तमपल्ली यांनी पक्षी, प्राणी आणि वनसंपत्तीवर अनेक पुस्तके लिहिली आहे. त्यांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. सोलापूरच्या गिरणी कामगारांच्या घरात जन्मलेल्या चितमपल्ली अरण्यऋषी म्हणून ओळखले जात. वन विभागात सेवा बजावत असताना मारुती चित्तमपल्ली यांनी पक्षी, प्राणी आणि वनसंपत्तीवर अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.

मारुती चित्तमपल्ली हे एक मेहनती संशोधक आणि वन अधिकारी म्हणून ओळखले जात. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वनीकरणाचा अभ्यास आणि लेखन करण्यासाठी समर्पित केलं होतं. चितमपल्ली यांना शिक्षणाचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला. झाडे लावण्याचा छंद त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून वारशाने मिळाला होता. पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांनी प्राथमिक शिक्षण सोलापूरमध्ये घेतलं होतं.

कॉलेजनंतर चित्तमपल्लीनं स्टेट फॉरेस्ट कॉलेज, पुढील व्यावसायिक शिक्षण कोइम्बतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), देहरादून येथील वन आणि वन्यजीव संस्थांमधून घेतले.कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट टायगर रिझर्व्हच्या विकास कामात त्यांचे मोठे योगदान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT