Chandrashekhar Bawankule 
महाराष्ट्र

Graduates Election : बावनकुळे, पटोले, वडेट्टीवारांसह १४ बड्या आमदारांना मतदानाला बंदी! काय आहे कारण?

Nagpur Graduates Constituency Election : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची धुमाकूळ सुरू असतानाच एक मोठी आणि रंजक माहिती समोर आली आहे. या मतदारसंघातील तब्बल १४ आमदार आणि २ खासदारांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. धक्कादायक म्हणजे लोकप्रतिनिधींच्या हातात जिल्ह्याच्या राजकारणाची दोरी आहे, तेच स्वतः या निवडणुकीत मतदार नाहीत.

मतदानाचा अधिकार का नाही?

पदवीधर मतदारसंघाच्या नियमानुसार, मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती पदवीधर (Graduate) असणे अनिवार्य असते. पण नागपूर विभागातील ३२ पैकी १४ आमदारांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी (दहावी, बारावी किंवा कॉलेजचे पहिले-दुसरे वर्ष) असल्यामुळे त्यांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळालेला नाही.

कोणते बडे नेते यादीत?

या मतदानापासून वंचित राहणाऱ्यांमध्ये भाजपचे दिग्गज नेते चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, आणि माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांसारख्या बड्या दिग्गजांचा समावेश आहे. केवळ आमदारच नाही, तर रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि राज्यसभेच्या खासदार माया इवनाते हेसुद्धा पदवीधर नसल्याने मतदार बनू शकलेले नाहीत.

कोण मतदान करू शकणार नाही? त्यांचं शिक्षण काय?

नागपूर जिल्हा :

कृष्णा खोपडे (७ वी), चरणसिंह ठाकूर (१२ वी), मोहन मते (ITI), प्रवीण दटके (डिप्लोमा Ist Year), चंद्रशेखर बावनकुळे (B.Sc Ist Year).

चंद्रपूर जिल्हा: विजय वडेट्टीवार (१० वी), किशोर जोरगेवार (१० वी).

भंडारा जिल्हा: राजू कारेमोरे (१२ वी), नाना पटोले (B.A. IInd Year).

गोंदिया जिल्हा: विनोद अग्रवाल (१२ वी), संजय पुराम (१२ वी).

गडचिरोली जिल्हा: धर्मरावबाबा आत्राम (१० वी).

वर्धा जिल्हा: समीर कुणावार (१२ वी), राजेश बकाने (B.A. Ist Year).

खासदार: माया इवनाते (५ वी), श्यामकुमार बर्वे (B.A. IInd Year).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - नाशिकच्या पेठ तालुक्यातील सावळघाटात रात्री भीषण अपघात

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मराठी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, एका वर्षातच गाशा गुंडाळला

Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींच्या खात्यावर 'या' दिवशी ३,००० येणार? महत्त्वाचं कारण आले समोर

Ajit Agarkar: अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपला; नवा सिलेक्टर कोण होणार? BCCI ने मागवले अर्ज

Shocking : भयंकर! पाण्याची टाकी साफ करायला उतरले परत बाहेर आलेच नाहीत; ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT