Samruddhi Highway Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे, अनेक वाहनांचे टायर फुटले; नेमका प्रकार काय? पाहा VIDEO

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. महामार्गावर १०० पेक्षा अधिक खिळे ठोकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनं पंक्चर झाली तर काहींचे टायर फुटले. त्यामुळे प्रवासी संतप्त झालेत.

Priya More

Summary -

  • समृद्धी महामार्गावर १०० पेक्षा जास्त खिळे ठोकले.

  • अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाले.

  • वाहतूक चार तासांसाठी बंद केली होती त्यामुळे वाहनचालक संतप्त झाले.

  • पोलिसांनी समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली.

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग सध्या चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. महामार्गावर सगळीकडेच खिळेच खिळे पाहायला मिळत आहे. या खिळ्यांमुळे याठिकाणावरून जाणारी अनेक वाहनं पंक्चर झाली तर काहींचे टायर फुटले. चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी खिळे ठोकल्याचा संशय प्रवाशांनी व्यक्त केला होता. पण आता यामागचे खरे कारण समोर आले आहे.

समृद्धी महामार्गवर खिळे ठोकण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी याठिकाणावरून प्रवास करणारी जवळपास ३ ते ४ वाहनांचे टायर पंक्चर झाले. समृद्धी महामार्गावर १०० पेक्षा जास्त खिळे ठोकण्यात आले. याचे फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत. हे खिळे पाहून हा नेमका काय प्रकार आहे असा प्रश्न वाहनचालकांना पडला. सुरूवातीला त्यांनी हे खिळे चोरट्यांनी ठोकले असल्याचा संशय व्यक्त केला. पण आता महामार्गाच्या कामासाठी हे खिळे ठोकण्यात आल्याचे समोर आले आहे.

समृद्धी मार्गावर पुलाच्या कामासाठी खिळे ठोकण्यात आले होते. या खिळ्यांमुळे अनेक गाड्यांचे टायर फुटले. त्यामुळे समृद्धी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रात्री ४ तास समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यावर वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी वाहन चालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संभाजीनगरच्या दौलताबाद परिसरातील ही घटना घडली. जर पुलाच्या कामासाठी हे खिळे ठोकण्यात आले होते तर समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी बॅरिकेड्स का लावले नाही? असा सवाल प्रवाशांनी केला आहे.

सोशल मीडिया इन्फ्यूअन्सर डॉ. शिवलक्ष्मी आईसाहेब यांनी याचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं हे सांगितले. 'मोठा कट उधळला गेला आहे. समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खिळे ठोकण्यात आले आहेत. केमिकलचा वापर करून ते ठोकण्यात आले आहे. याठिकाणावरून जात असताना जागीच वाहनांचे चारही टायर पंक्चर होत आहेत. यामुळे समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस प्रशासनाने आधीच वाहनचालकांना सतर्क करणे गरजेचे आहे. १०० पेक्षा जास्त खिळे रस्त्यावर ठोकून समाजकंटकांनी अनेक जीवांशी खेळण्याचा प्रयत्न केला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मेगा ब्लॉकमुळे 'मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस' रद्द

Mumbai : एसआरए इमारतीत BMC कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, मुंबईत धक्कादायक घटना

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल योजनेसाठी १० टक्के वाळू मोफत मिळणार

Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT