Aslam Sheikh Saam Tv
महाराष्ट्र

अस्लम शेख यांचा राज ठाकरेंना इशारा, म्हणाले- अन्यथा कडक कारवाई करू

कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद: महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) औरंगाबादेत होणाऱ्या मेळाव्याबाबत इशारा दिला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. अस्लम शेख म्हणाले की, प्रत्येकाला आपला कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. मात्र कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासन (Administration) कडक कारवाई करेल. केवळ अजानचा मुद्दा नाही, तर मंदिरांमध्ये आरती होते. संपूर्ण देशासाठी समान कायदा असायला हवा, तो पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

हे देखील पाहा-

महाराष्ट्रातील महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता त्यांना योग्य ती जागा दाखवणार आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad) कलम 144 लागू असताना देखील राज ठाकरेंना आज संध्याकाळी अटींसह रॅली काढण्याची परवानगी मिळाली आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होत आहे. पुण्यातून (Pune) हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरेंनी दोन घोषणा केल्या त्यापैकी एक होती औरंगाबादची सभा. गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले होते.

यानंतर ठाण्यातील उत्तरसभेमध्ये राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. या सभेसाठी मनसेचे (MNS) कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औरंगाबादेमध्ये दाखल होत आहेत. या सभेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सभेची आठवडाभरापासून राज्यभर चर्चा सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

SCROLL FOR NEXT