MLA Kailas Patil Fast Strike कैलास चौधरी
महाराष्ट्र

Osmanabad News: आमदार कैलास पाटील यांचं उपोषण तात्पुरतं स्थगित; फडणवीसांशी फोनवर झाली चर्चा

MLA Kailas Patil Fast Strike: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणस्थळी जाऊन भेट दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उस्मानाबाद: शेतकऱ्यांचे पिकविमा अनुदानासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी आंदोलन केलं आहे. गेल्या सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु आहे. आता हे उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे. या आंदोलनाला जिल्ह्याभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. (mla kailas patil strike against Maharashtra government)

मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणस्थळी जाऊन भेट दिली. यावेळी दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. आमदार कैलास पाटील यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संवाद साधला, यावेळी उपोषण शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चर्चा झाली.

यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही फोन लावण्यात आला होता. उध्दव ठाकरे यांचीही कैलास पाटील यांच्यासोबत फोनवर चर्चा झाली. उध्दव ठाकरे यांनी कैलास पाटील यांना उपोषण मागे घेण्याची सूचना केली. त्यानुसार आमदार कैलास पाटील यांनी आपलं उपोषण (Fast Stike) तात्पुरतं स्थगित केलं आहेत.

यावेळी उपोषणस्थळी त्यांची मुलगी आराध्या आणि पुतणी राजेश्वरी ह्या आल्या होत्याय त्यानंतर एकच भावनिक वातावरण तयार झाले. एक मुलगी आणि पित्याचे नाते किती घट्ट असते हे यावेळी पाहायला मिळाले. आंदोलतून चला असे म्हणत या दोघींनी अनेक वेळा आमदार पाटील यांचे हात ओढले, त्यानंतर गळयात पडून गालावर गोड पापा घेतला. कैलास पाटील यांना ग्रामीण भागातूनही अनेक महिला शेतकरी येऊन भेटत होत्या आणि डोळ्यात अश्रू आणत असून आंदोलन मागे घेण्याची विनंती करत होत्या. (Maharashtra News)

दरम्यान, या आंदोलनाला २८ ऑक्टोबरला हिंसक वळण लागले होते. शिवसेनेच्या (shivsena) कार्यकर्त्यांनी एसटी बस फोडून हे आंदोलन चिघळवले. आंदोलन करूनही शासनाने कोणत्याच प्रकारची दखल घेतली नसल्याने कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. कार्यकर्त्यांनी दोन शहरात दोन ठिकाणी बस फोडून निषेध करत जोरदार जोरदार घोषणाबाजी केली होती. मात्र, आता तात्पुरतं हे उपोषण स्थगित करण्यात आलं आहे.

Edited By - Akshay Baisane 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT