Osmanabad आकाशातून पडला सोनेरी दगड; स्पेस सायन्सच्या दृष्टीने हा उल्कापात नव्हे! कैलास चौधरी
महाराष्ट्र

Osmanabad आकाशातून पडला सोनेरी दगड; स्पेस सायन्सच्या दृष्टीने हा उल्कापात नव्हे!

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी शहराजवळ ऐका शेतकऱ्याच्या शेतात उल्कापात खळबळ उडाली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी शहराजवळ ऐका शेतकऱ्याच्या शेतात उल्कापात खळबळ उडाली होती. या ठिकाणी वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर असा उल्कापात होण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. जागेची पाहणी आणि स्थिती तपासल्यानंतर प्रथम दर्शनी हा उल्कापात वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील पहा :

त्याचबरोबर जिऑलॉजिकल आणि स्पेस सायन्सच्या दृष्टिकोनातून देखील हा उल्कापात नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी साम टीव्हीला दिले आहे. प्रभू निवृत्ती माळी यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर रात्रीच्या वेळी आकाशातून एक दगड पडला असल्याचे सांगितले होते. तो अर्धवट जळालेल्या स्वरूपात होता. शेतात तुंबलेले पाणी काढत असताना माळी यांना विचित्र आवाज ऐकायला आला असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे होते.

हा गडद सोनेरी गव्हाळ रंगाचा आहे, तसेच त्याची लांबी 7 इंच, तर रुंदी 6 इंच आहे. साडेतीन साधारणपणे अडीच किलो वजनाचा हा दगड आहे. त्यामुळे लोकांमध्ये उल्कापात झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र, वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी भेट दिल्यानंतर प्रथमदर्शनी हा उल्कापात नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

SCROLL FOR NEXT