सीमेवरील जवानांना यंदा राख्या पाठवल्याचं नाहीत! Saamtv
महाराष्ट्र

उस्मानाबाद । सीमेवरील जवानांना यंदा राख्या पाठवल्याचं नाहीत!

गेल्यावर्षी जिल्हाभरातून सीमेवरील जवानांसाठी सहा हजार राख्या पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, यावर्षी जवानांसाठी एकही राखी पाठवण्यात आल्याची नोंद पोस्ट ऑफिस मध्ये नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद - बहिणीने पाठवलेली राखी भावापर्यंत पोहचवण्यासाठी आजच्या सुट्टीच्या दिवशीही पोस्ट ऑफिस सुरू आहे. मात्र, यावर्षी पोस्टाने राखी पाठवण्याचे प्रमाण कमी झालं आहे.

हे देखील पहा -

गेल्यावर्षी जिल्हाभरातून सीमेवरील जवानांसाठी सहा हजार राख्या पाठवण्यात आल्या होत्या मात्र, यावर्षी जवानांसाठी एकही राखी पाठवण्यात आल्याची नोंद पोस्ट ऑफिस मध्ये नाही त्यामुळे सीमेवरील जवानांबद्दल जनतेचे उस्मानाबादवासीयांचे प्रेम कमी झालंय की काय असा सवाल उपस्थित होतोय.

दरवर्षी वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक संघटना जवानांना पोस्टाने राखी पाठवण्याचे उपक्रम राबवत असतात. गेल्यावर्षी कडक लॉकडाऊन असताना देखील उस्मानाबाद जिल्ह्यातून 6 हजार राख्यांचे पॉकेट पोस्ट ऑफिस द्वारे जवानांसाठी पाठवण्यात आले होते. यात जिल्हाभरातील काही शाळांनी देखील सहभाग घेतला होता. मात्र, यावर्षी अनलॉक प्रक्रिया सुरू असताना देखील असा उपक्रम राबवण्यात आला नसल्याची माहिती पोस्ट ऑफिस मधून प्राप्त झाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT