Osmanabad Accident कैलास चौधरी
महाराष्ट्र

Osmanabad Accident: देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात

नी शिंगणापूर येथून देवदर्शन करून भाविक पीकअपने घरी निघाले होते. त्याचवेळी परंडा-सोनारी रस्त्यावर खानापूर पाटीजवळ पीकअपला भीषण अपघात झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी -

उस्मानाबाद: देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) दोन भाविकांचा मृत्यू झाला. तर दहा जण जखमी झाले आहेत. परंडा-सोनारी रस्त्यावर खानापूर पाटीजवळ हा अपघात झाला. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनी शिंगणापूर (Shani Shinganapur) येथून देवदर्शन करून भाविक पीकअपने घरी निघाले होते. त्याचवेळी परंडा-सोनारी रस्त्यावर खानापूर पाटीजवळ पीकअपला भीषण अपघात झाला. यात भूम तालुक्यातील नळेगाव येथील दोघांचा मृत्यू झाला. तर दहा जण गंभीर जखमी झाले. काल, बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

भूम (Bhum) तालुक्यातील वडगाव नळी येथील भाविक शनी शिंगणापूर येथील कावड यात्रा घेऊन पीकअप वाहनाने गावाकडे परतत होते. परंडा- सोनारी रस्त्यावर खानापूर पाटीजवळ पीकअप आणि उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक झाली. यात २६ वर्षीय मंगेश गायकवाड याच्यासह अन्य एका तरुणाचा मृत्यू झाला. तर पीकअपमधील इतर दहा भाविक गंभीर जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT