Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

सतीश उकेंवरील कारवाई मूळ नागपूर पोलिसांची : देवेंद्र फडणवीस

साम टिव्ही ब्युरो

नागपूर: काल नागपुरात ईडीने (ED) वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरी धाड टाकली. यात उके यांचा लॅपटॉप जप्त करुन त्यांना चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेतले आहे. सतीश उके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यावर आरोप केले होते. उके हे काँग्रेसचे (Congress) आमदार नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील असल्याने ही कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे. यावर आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली.

'सतीश उके यांच्यावर ईडीने केलेली कारवाई ही मूळ नागपूर पोलिसांची आहे. नागपूर पोलिसांनी ही तक्रार केली होती. त्यानूसार काल ईडीने कारवाई केली आहे. उके यांच्याविरोधात 2005 पासून गुन्हे दाखल आहेत', अस देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. आज फडणवीस नागपुरात दाखल झाले आहेत.

सतीश उके यांच्यावर ईडीची कारवाई

अॅड. सतीश उके यांच्या घरी गुरुवारी पहाटे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकला. सहा तास कसून चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी ॲड. उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना अटक केली.

उके यांनी सातत्याने भाजप (BJP) नेत्यांविरोधात खटले चालवित आहेत. नितीन गडकरी (Nitin Gadkari), देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात खटले चालवीत आहेत. तसेच नाना पटोले यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात उके ते त्यांच्या बाजूने लढताहेत. त्यामुळे ही ईडी (ED) ने कारवाई केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, उके यांच्यावर जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगाने हा छापा टाकल्याचं बोललं जातं आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thacekray Dombivli Speech: फडणीवस ते मोदी ठाकरेंनी सगळ्यांनाच धारेवर धरलं

Today's Marathi News Live : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा

Bhiwandi Politics News | "ते भाजपचीच बी टीम.." भिवंडीच्या राजकारणात एकच खळबळ

Maharashtra Politics 2024 : '२ वर्षांनंतर नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होतायेत...'; राजकीय निवृत्तीवरून डोबिंवलीतील सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपला घेरलं

Sanjay Kaka Patil News | "तो जन्मालाच आला नाही.." मीच जिंकेन संजय पाटलांचं निकालावरुन मोठ वक्तव्य

SCROLL FOR NEXT