ग्रामपंचायत सक्षमीकरणसाठी फळबाग लागवडीस प्रोत्साहन द्यावे - पवार  दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

ग्रामपंचायत सक्षमीकरणसाठी फळबाग लागवडीस प्रोत्साहन द्यावे - पवार

औसा येथील भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांची राज्य शासनाकडे मागणी

दीपक क्षीरसागर

लातूर : सध्या कोरोनाच्या काळात गावखेड्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ठिकाणी फळबाग लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने भरीव मदत करत ग्रामपंचायतीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी औसा येथील भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्य शासनाकडे पत्राद्वारे केली आहे.

हे देखील पहा -

सध्याला गावांचा विकास करावयाचा झाल्यास ग्रामपंचायतीला वित्त आयोगाच्या पैशावर अवलंबून राहावे लागत आहे वित्त आयोगाच्या नियमानुसार प्रती व्यक्ती 920/- चा निधी उपलब्ध होतो. तर दुसरीकडे ग्रामपंचायतीला स्वतःचा निधी नाही, यामुळे गावचा विकास करताना अनेक अडचणी येत आहेत यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु वैद्यकीय दवाखाने, अंगणवाडी, शाळा, गायरान आणि गावठाण हद्दीत असलेल्या रिकाम्या जागेत फळांच्या झाडाची लागवड केली तर त्यातून ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊन ग्रामविकास शक्य होणार आहे.

सध्याला वृक्ष लागवड योजनेत 30% फळबाग लागवड तर 70%सावलीची वृक्ष असा निकष आहे राज्य शासनाने 100%फळबाग लागवडीसाठी पोषक नियमावली व प्रोत्साहन दिले तर नक्कीच गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या स्वतः सक्षम होईल असा विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांना वाटत आहे यासाठी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्रांद्वारे मागणी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT