Maharashtra Today Weather News Saam Tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : राज्यात पावसाचा धुमाकूळ! आज अनेक जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट', गारपिटीचाही इशारा, पुढील ३ तास महत्त्वाचे

orange alert districts in Maharashtra weather update today : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Orange alert Maharashtra Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात राज्यावर अवकाळी पावसाचे सावट गडद झाले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारी पुणयासह काही ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी आता 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' ?

उत्तर महाराष्ट्र: जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर.

पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर.

मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली.

उर्वरित महाराष्ट्रातही वादळी पावसाची शक्यता असल्याने तिथे 'यलो अलर्ट' कायम ठेवण्यात आला आहे.

पुढील ३ तासांत राज्यात पावसाचा इशारा -

राज्याच्या काही भागात पावसासोबतच मोठी गारपीट होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते. पुढील 3 तासात मेघगर्जना, विजांचा कडकडाट राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने अनेक भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाज पुणे हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पिकांचे नुकसान -

कडाक्याच्या उन्हात पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमामात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर भाजी-पाला आणि फळे मातीमोल झाली आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय. अवकाळीचा फटक्याने राज्यात ६३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान आकडा वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात मार्चमधील अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे सुमारे ६२ हजार ९६९ हेक्टरवरील शेती व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. एप्रिलमध्येही अवकाळी सुरू राहण्याची शक्यता असल्याने नुकसान वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात राज्यात पावसाचा इशारा -

पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे. चार दिवस पुणे शहराला येलो अलर्ट देण्यात आला आहे. शहर आणि परिसरात कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले आहे. पुढील चार दिवस मात्र पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अवकाळी पावसाने पुणेकरांना दिलासा मात्र अनेक ठिकाणी झाडपडी झाली आहे. पावसामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पुण्यात चाळीशीपार तापमानानंतर सोमवारी मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

यात पाषाणमध्ये ४६ तर लोहगाव येथे ३८ मिमी पावसाची नोंद झाली. तर काही भागात गारांचा वर्षाव झाल्याने १४ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या परिणामी वाहतूक कोंडी आणि दुचाकी घसरण्याच्या घटना घडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Viral News : मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर अर्ध्यारात्री जोडप्याचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

Maharashtra News Live Update: श्रीरामपूर येथील भोंदू अशोक आढावला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी

Census 2026 : स्व-गणना पूर्ण करणारं कोकणातलं हे गाव पहिलं ठरलं

ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? वेळीच करा रिन्यूअल,नाहीतर येईल डोक्याला हात लावण्याची वेळ; जाणून घ्या प्रोसेस

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, महागाईचा भडका उडणार? PM मोदींच्या विधानामागे काय आहेत आर्थिक कारणे?

SCROLL FOR NEXT