Maharashtra Government Contract Recruitment Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: रोजगाराच्या धंद्यात सरकारची ठेकेदारी? राज्यात पुन्हा कंत्राटी भरती; 9 कंपन्यांवर सरकार मेहरबान?

Maharashtra Government Contract Recruitment: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून पुन्हा कंत्राटी भरती केली जाणारंय.. त्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांनी जोर धरलाय. या कंत्राटी भरतीमुळे गेल्यावर्षी निवडण्यात आलेल्या 9 कंपन्यांचं उखळ पांढरं होणार असल्याचं बोललं जातंय.

Mayuresh Kadav

कंत्राटी भरतीला होणारा विरोध लक्षात घेता राज्य सरकारनं कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला खरा मात्र आता आपल्याच निर्णयाला हरताळ फासत सरकारनं पुन्हा कंत्राटी भरतीचा घाट घातलाय. शासकीय महाविद्यालयं आणि रूग्णालयांमध्ये तब्बल 6 हजार 830 पदं भरली जाणार आहेत.

मात्र या भरतीवरून सरकार संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय. ही भरती आपलं उखळ पांढरं करून घेण्यासाठी तर नाही ना, असा आरोप विरोधकांमधून होऊ लागलाय. ही 9 कंपन्यांची नेमकी भानगड काय आहे? ते आधी समजून घेऊयात...

गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 9 कंपन्यांचं पॅनेल तयार करून त्यामार्फत कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर बरीच ओरड झाल्यानंतर सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला.

या भरतीतून अतिकुशल, कुशल, अर्धकुशल, अकुशल कर्मचाऱ्यांना रोजगार दिला जाणार होता. यातील काही कंपन्या आयटी क्षेत्रातील असून काही कंपन्या सरकारसह विविध खासगी संस्थांना मनुष्यबळाचा पुरवठा करत आहेत. काही राजकीय नेत्यांच्या कंपन्यांकडून राज्यभरातील महापालिका, नगरपालिकांसह शासकीय विभागांना सुरक्षारक्षक तसंच इतर कर्मचाऱ्यांचा पुरवठा केला जातोय.

कंत्राटी भरतीला विरोध असतानाही सरकारनं पुन्हा कंत्राटी भरतीचा निर्णय घेतलाय. या माध्यमातून याच नऊ कंपन्यांना पुन्हा या प्रक्रियेत आणलं जाऊ शकतं, अशी शक्यता व्यक्त होतीय. विरोधक आणि बेरोजगारांच्या रेट्यामुळे ज्या कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता त्याच कंपन्यांना छुप्या मार्गानं रस्ता खुला केला जाणार का, असा सवालही यानिमित्तानं उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT