Online Rummy Addiction saam Tv
महाराष्ट्र

Online Gaming Maharashtra: ऑनलाईन रमीच्या नादात घरदार, शेती गमावली; डोक्यावर झालं 80 लाखांचं कर्ज

Online Rummy Addiction : ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन शहारासह ग्रामीण भागातील तरुणही उद्ध्वस्त होत आहेत. यातून कर्जबाजारीपणा येत असून अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत.

Bharat Jadhav

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाईन रमी गेम खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर राज्यात ऑनलाईन रमी गेमची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाली. पण या ऑनलाईन रमी गेमच्या व्यसनामुळे असंख्य तरुण कर्जबाजारी झाल्याचं चित्र आहे. या खेळाची जाहिरात टीव्ही सर्रासपणे दाखवली जाते. पण या गेमच्या आहारी जाऊन अनेक तरुण कर्जबाजारी होत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील जय जाधव नावाच्या तरुणाने या गेमच्या नादात घर, शेती, गमावलीय. गेमच्या व्यसनापायी २६ वर्षीय जय जाधव यांच्यावर ८० लाखांचं कर्ज झालंय. जय जाधव हा तरुण शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. त्याला ऑनलाईन रमी गेमचं व्यसन लागलं. गेमच्या व्यसनात त्यांच्या डोक्यावर तब्बल ८० लाख रुपयाचं कर्ज झालंय. याबाबतची वृत्त एका मराठी वृत्तसंस्थेनं दिलंय.

जयने रमीच्या नादात रिअल इस्टेट व्यवसायातून कमावलेले २३ लाख, मित्रांकडून घेतलेले २० लाखांचं कर्ज, दीड एकर शेतजमीन, स्कॉर्पिओ गाडी गहाण ठेवून आणलेले पैसे, हे सर्व काही गमावलं. महाराष्ट्रात ऑनलाईन जुगार, विशेषतः रमी, पोकर, आणि क्रिकेट बेटिंग यांचे व्यसन झपाट्याने वाढू लागेल आहेत. पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूरसारख्या शहरी भागांपासून ते ग्रामीण भागातील युवक या खेळाच्या आहारी गेले आहेत.

गेमच्या जाहिरातीवर आमदार बच्चू कडूंचा संताप

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल व्हिडिओवरून टीका करताना बच्चू कडू यांनी जाहिरातीवरून टीका केलीय. रमी खेळामुळे अनेकांचा संसार उद्धवस्त झालाय. अनेकजण कर्जबाजारी झाल्याचं बच्चू कडू म्हणाले. या गेममुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या आहेत तरीही गेमवर बंद का घातली जात नाही, असा सवाल बच्चू कडू यांनी केलाय. त्याबरोबर त्यांनी जाहिरात करणाऱ्या सिनेस्टार आणि क्रिकेटर्सवर टीका केलीय. क्रिकेटर सिनेस्टार हे त्या गेमची जाहिराती करतात, त्यांना लाज का वाटत नाही. जाहिरात करणारे भिकारचोटा पेक्षाही भिकारचोट आहेत, असं बच्चू कडू म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: पवईत घराची भिंत कोसळली, १ जण गंभीर जखमी

Nitesh Rane : वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे; वाळू चोरीवरून मंत्री नितेश राणे आक्रमक

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, कार डिव्हायडर तोडून ट्रकला धडकली, ६ मित्रांचा मृत्यू

Jalna : स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणाऱ्याच्या कमरेत पोलीस अधिकाऱ्याने घातली लाथ, व्हिडीओ व्हायरल

Chanakya Niti : लग्नानंतर प्रेम कमी होऊ नये म्हणून हा गुपित मंत्र

SCROLL FOR NEXT