Sharad Pawar News Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar on Onion Procurement : केंद्र सरकारच्या कांदा खरेदीच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Sharad Pawar News : केंद्र सरकराने कांद्याला प्रतिक्विंटलला दिलेला भाव हा उत्पादन खर्च काढणाराही नाही, असं शरद पवार म्हणाले.

Rashmi Puranik

Sharad Pawar on Onion Purchase:

महाराष्ट्रात कांदा प्रश्न पेटलाय. अशातच केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांदा प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. यावर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही, असं ते म्हणाले.

केंद्र सरकराने कांद्याला प्रतिक्विंटलला दिलेला भाव हा उत्पादन खर्च काढणाराही नाही, असं शरद पवार म्हणाले. कांदा टिकणारा आहे. त्यामुळे शेतकरी थांबायला तयार आहे. परिणामी सरकारने निर्यात शुल्क कमी करावं, असंही शरद पवार म्हणाले.

नेमकं शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात प्रश्नी घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्र सरकारने प्रतिक्विंटलला २४१० रुपयांचा दिलेला भाव कमी आहे. चार हजार रुपये भाव द्यावा, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च २४०० रुपयांमध्ये निघणार नाही. हा कांदा टिकणारा आहे. त्यामुळे शेतकरी थांबायलाही तयार आहे. त्यामुळे निर्यात शुल्क कमी करावं, असे शरद पवार म्हणाले.

शेतकरी आक्रमक

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न पेटलाय. निर्यात शुल्कामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. राज्यातील वेगवेगळ्या भागात निदर्शनं करत, रास्तारोको करत शेतकऱ्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारसमोर मांडले. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या कांदा खरेदीचा निर्णय ट्वीट करत जाहीर करुन टाकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chalisgaon News : निकालापूर्वी चाळीसगावात झळकले विजयाचे बॅनर; आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Ratnagiri Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT