Nagar Manmad Highway Accident  Saam tv
महाराष्ट्र

Nagar Manmad Highway Accident : योजनेचा लाभ घेण्याची इच्छा अधुरीच राहिली; तहसील कार्यालयाकडे जाताना वाहनाने उडवले, महिला जागीच ठार

Vishal Gangurde

अजय सोनवणे, साम टीव्ही प्रतिनिधी

नाशिक : राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी महिलांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु आहे. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी सेतू कार्यालयाबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. राज्यभरातील कार्यालयात अशीच गर्दी पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारे योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करत असताना एका महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे गोळा करण्याच्या कामानिमित्ताने तहसील कार्यालयाकडे जाताना एका महिलेला भरधाव वाहनाने धडक दिली. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. उज्वला चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे.

तहसील कार्यालयाच्या गेटजवळील नगर-मनमाड महामार्गावर ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर या महिलेचा मृतदेह शविच्छेदनासाठी पाठण्यात आला आहे. या अपघातप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

नाशिकमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, एक जण ठार

नाशिकच्या देवळा-सौंदाणे रस्त्यावर दोन कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. पवजीदेव बाबा फाट्याजवळ हा अपघात झाला आहे.

मालेगावहून कळवणच्या दिशेने जाणारी कार आणि सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन मध्यप्रदेशकडे जात असलेल्या या दोन्ही कारचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात कळवण येथील गणेश ततार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या कारमधील चार जण जखमी झाले आहेत.

भीषण अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहेत. अपघातानंतर पावजीदेव बाबा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. या अपघातामधील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामधील गणेश ततातर हे कळवण मर्चंट बँकेत करत होते. त्यांच्या अपघातात मृत्यू झाल्याने कळवणमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : PM मोदींनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी पूर्व केली, अजित पवार

Rinku Singh Tattoo: रिंकू सिंगच्या नव्या टॅटूची जोरदार चर्चा; पण 'Gods Plan'चा नेमका अर्थ काय? VIDEO

बारामती नाही, मग अजित पवार कुठून लढणार? पाहा VIDEO

kalyan Navratri 2024 : नवरात्रीनिमित्त कल्याणमधील देवींच्या 'या' प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या

Esha Negi: 'हे सगळं करावच लागेल...' टीव्ही अभिनेत्रीने शेअर केला कास्टिंग काऊचा धक्कादायक किस्सा

SCROLL FOR NEXT