Pune Banglore National Highway, Shirwal, Satara, 
Accident, Warkari, Kolhapur, Alandi
Pune Banglore National Highway, Shirwal, Satara, Accident, Warkari, Kolhapur, Alandi  Saam tv
महाराष्ट्र

आळंदीस निघालेल्या वारकऱ्यांच्या वाहनाचा झाला भीषण अपघात; एक ठार, 28 जखमी

साम न्यूज नेटवर्क

शिरवळ (satara latest marathi news) : कोल्हापुर (kolhapur) येथून आळंदीस (alandi) निघालेल्या वारक-यांच्या (warkari) वाहनाचा शिरवळ (shirwal) येथे आज पहाटेच्या सुमारास अपघात (accident) झाला. या अपघातात एक वारकरी (warkari passes away in a road accident near shirwal) ठार झाला असून 28 जण जखमी (injured) झाले आहेत. त्यापैकी दाेघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. या अपघातात मायाप्पा कोंडीबा माने (राहणार भादोले, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच मारुती भैरुनाथ कोळी हे गंभीर जखमी झाले आहेत. (shirwal warkari accident news)

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार पुणे बंगळूर महामार्गावरील (pune banglore national highway) शिरवळनजीक हा अपघात पहाटे तीन वाजता झाला. वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या दिंडीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीस (एम.एच.१०.वाय. ५७०५) भरधाव आलेल्या भाजीच्या टेम्पोंने (एम.एच.४५. ए.एफ.२२७७) पाठीमागून धडक दिली.

ही धडक इतकी भीषण हाेती की वारकरी वाहनातून उडून रस्त्यावर पडले. त्यामुळे ते रस्त्यावरच विव्हळत हाेते. त्यांच्या हाता पायांना जखमा झाल्या आहेत. या अपघातात एकूण 28 वारकरी जखमी झाले आहेत. त्यापैकी दाेघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामधील सर्व वारकरी हे भादुले, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर (kolhapur) येथील रहिवासी आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT