Akola News Saam TV
महाराष्ट्र

Akola News: राज्यात आणखीन एका शेतकऱ्याचा बळी; बॅंकेचे कर्ज डोईजड झाल्याने संपवले जीवन

अकोल्यातील दगडपारवा गावातील एका शेतकऱ्याने बॅंकेचे कर्ज डोईजड झाल्याने स्वत:चे जीवन संपवले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Akola News: राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण थांबण्याचे नाव घेत नाही. दररोज एका शेतकऱ्याच्या आत्महत्येची घटना समोर येत आहे. सततच्या नापिकीने आज आणखीन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अकोल्यातील दगडपारवा गावातील एका शेतकऱ्याने बॅंकेचे कर्ज डोईजड झाल्याने स्वत:चे जीवन संपवले आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (Latest Farmer News)

प्राप्त माहितीनुसार, दत्तात्रेय गोपाल मुळे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे कर्ज असल्यामुळे ते चिंतेत होते. त्यातच सततची नापिकी असल्यामुळे ते कर्जाची परतफेड करण्यासाठी असमर्थ होते. या विवंचनेतून कशी सुटका करून घ्यावी हे त्यांना सुचत नव्हते. अशातच राहत्या घरी विष प्राशन केले.

कुटुबीयांना याची माहिती मिळताच त्यांना सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबावर प्रचंड आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार असून एका मुलीचे लग्न झालेले आहे. तर दुसरी मुलगी शिक्षण घेत आहे. बार्शिटाकळी पोलिसांनी या विषयीची नोंद घेऊन, मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथविधीनंतर पहिलीच घोषणा केली, ती म्हणजे 'शेतकरी (Farmer) आत्महत्या मुक्त महाराष्ट्र' करण्याची दरम्यान यावर अकोल्याच्या (Akola) कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना विचारले असता आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे आदेश सुचना शासनाकडून प्राप्त झाल्या नसल्याचं सांगितलं होतं. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT